पिंपरी-चिंचवड

जिल्हा रुग्णालयात तिरळेपणावर मोफत शस्त्रक्रिया शिबिर

CD

पिंपरी, ता. ३० : डोळ्यांच्या तिरळेपणावरील १९७ वे मोफत शस्त्रक्रिया शिबिर औंध जिल्हा रुग्णालयात आयोजित करण्यात आले आहे. शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात शनिवारी (ता. ३१) सकाळी १० वाजता तपासणी होणार आहे. पात्र रुग्णांवर रविवारी (ता. एक फेब्रुवारी) सकाळी १० वाजता मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये लवकर उपचार केल्यास भविष्यातील गंभीर गुंतागुंत टाळता येते. शिबिरांद्वारे आतापर्यंत शेकडो रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तिरळेपणावर वेळीच शस्त्रक्रिया केल्यास दृष्टीदोष, व्यंग आणि मानसिक न्यूनगंड सहज दूर करता येणार आहे, असे औंध जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. अंजली कुलकर्णी यांनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील जिल्हा अंधत्व नियंत्रण सोसायटी, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटी, लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर आणि समता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर आयोजित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! लाडक्‍या बहिणींची होणार फेरपडताळणी; ई-केवायसीमुळे लाभ बंद झालेल्यांना दिलासा, काय दिल्यात सूचना?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 फेब्रुवारी 2026

Maharashtra Weather Update : राज्यात ढगाळ वातावरण कायम, 'या' ५ जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार; हवामान विभागाचा अंदाज

U19 World Cup: भारताच्या पाकिस्तानवरील विजयाने सेमीफायनलचं वेळापत्रक निश्चित! जाणून घ्या कोणाविरुद्ध अन् कधी होणार सामना

आजचे राशिभविष्य - 2 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT