पिंपरी, ता.९ ः मागील दीड वर्षांहून अधिक काळ काम सुरू असलेल्या पिंपळे निलख भागातील रक्षक चौक येथील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. किरकोळ कामे उरकून पूल मार्चनंतर रहदारीसाठी खुला करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
रक्षक चौकातील उड्डाणपुलाच्या रचनेत वाहतूक व्यवस्थेचा समतोल राखण्यात आला आहे. हा पूल रहदारीसाठी खुला झाल्यास कोंडीचा त्रास कमी होऊन रहदारी विना अडथळा सुकर होण्यास मदत होणार आहे. पिंपळे निलखकडून येणाऱ्या वाहनांसाठी खालच्या बाजूने स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच सैन्य दलातील वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांसाठी उड्डाण पुलाच्या खालच्या बाजूने मार्गाची सुविधा ठेवण्यात आली आहे. यामुळे लष्करी वाहतूक, पीएमपीएमएल बस, पादचाऱ्याचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
सिग्नल विरहित वाहतूक
सांगवी फाटा ते रावेत या दिशेने जाण्या-येण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करण्यात येणार आहे. उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर सिग्नल विरहीत वाहतूक शक्य होणार आहे. प्रवासाचा वेळ कमी होऊन इंधन व वेळेची बचत होणार आहे.
पुलाची रचना
- २६.४ मी. रुंद, ३४५ मी. लांब व ५.५ मी. उंच
- कामाचा कालावधी १८ महिने. (एप्रिल २०२६ पर्यंत)
मागील दोन वर्षांपासून येथील काम पूर्ण होण्याची प्रतिक्षा आहे. नियमित कोंडीमुळे नागरिकांना त्रास सहन करत मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे वेळ, इंधन अपव्यय होत आहे. येथील काम लवकर पूर्ण करून रहदारी सुकर करावी.
- माधुरी बैकर, नागरिक, विशालनगर
रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होऊन तो नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. त्यादृष्टीने किरकोळ कामे वगळता उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. मार्च अखेरपर्यंत पूल रहदारी खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- संध्या वाघ, कार्यकारी अभियंता, शहरी दळणवळण विभाग, महानगरपालिका
Associated Media ः PIM26B20955
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.