पिंपरी-चिंचवड

ममता अंध शाळेमध्ये रक्षाबंधनाचे हृदयस्पर्शी दर्शन

CD

पिंपळे गुरव, ता. ९ ः रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. याच सणाचे एक आगळेवेगळे, हृदयस्पर्शी दर्शन पिंपळे गुरव येथील ममता अंध अनाथ कल्याण मंडळात अनुभवायला मिळाले. काही महिलांनी दृष्टिहीन आणि अनाथ बांधवांना राखी बांधून आपुलकीचा स्पर्श दिला.
सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी जगताप यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. याप्रसंगी ममता अंध व अनाथ आश्रमाचे तुषार कांबळे, शीतल आगरखेड, मीना दळवी, पूनम इनामदार आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना जगताप म्हणाल्या, ‘‘आज मी केवळ राखी बांधली नाही; तर माझ्या अंध व अनाथ भावांना एक हक्काची बहीण म्हणून ममतेने सामावून घेतले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यांमधील भावना. हाच माझ्यासाठी खरा रक्षाबंधनाचा उत्सव आहे.’’
विद्यार्थ्यांनी देखील ताई, तू बहीण म्हणून आमच्यासाठी आलीस. आता आम्ही कधीच एकटे नाही, अशा शब्दांत आपले प्रेम व्यक्त केले. उपस्थित शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

PMG25B02675

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : राज्यासह देशविदेशातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

Virat Kohli And Rohit Sharma: विराट, रोहितपेक्षा टी-२० विश्‍वकरंडक महत्त्वाचा; एकदिवसीय क्रिकेटमधील सहभागाबाबत नंतर निर्णय

Karad North Politics: कऱ्हाड उत्तरेत काँग्रेसचा ‘करेक्ट कार्यक्रम’; भाजपकडून कोपर्डे हवेली बालेकिल्ल्यात शिरकाव, अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

Pune : रक्षाबंधनाला भाऊ रिकामा आला तर जीवे मारू, नवऱ्याच्या धमकीनंतर २७ वर्षीय विवाहितेनं संपवलं आयुष्य

मोठी बातमी! शिक्षण विभाग शोधणार ‘बोगस लाडके शिक्षक’; ४.८३ लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची फेरपडताळणी; ‘या’ शिक्षकांची जाणार नोकरी

SCROLL FOR NEXT