पिंपरी-चिंचवड

तुझ्या एका दिवसाच्या पूजेने । कसा होऊ उतराई ।।

CD

पिंपळे गुरव, ता. २२ : हलगी, कच्छी, घुमकं यासारखी पारंपरिक वाद्ये वाजवत पिंपळे गुरव, सांगवी-दापोडी, वाकड यासारख्या उपनगरांत बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. तसेच बैलपोळा सण उत्साहात व थाटामाटात साजरा करण्यात आला. तुझ्या अपार कष्टाने । बहरते सारी भुई ।। एका दिवसाच्या पूजेने । कसा होऊ उतराई ।। अशा भावनाच जणू शेतकरी व बैलगाडाप्रेमींनी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड शहर हे मुळात अनेक गावे, वाड्या-वस्त्यांचे बनले आहे. सध्या शहर आधुनिकतेकडे वाटचाल करत असले तरी ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि चालीरिती आवर्जून जपल्या जात आहेत. काळाच्या ओघात आता शेतजमिनी फारशा शिल्लक राहिलेल्या नाहीत. तरी शेतकऱ्यांचा मुख्य सण असललेला बैलपोळा उपनगरांत उत्साहाने साजरा केला जात आहे.
पिंपळे गुरवमध्ये दरवर्षी बैलपोळ्यानिमित्त बैलांची सजावट, पूजा व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलपोळा साजरा केला जातो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलजोडीची खांदामळणी केली जाते. त्यानुसार सकाळपासूनच शेतकऱ्यांची लगबग सुरू राहिली. बैलांना अंघोळ घालून त्यांना बाशिंग, फुगे, मणीमाळ, रंगरंगोटी व पारंपरिक साजशृंगार करून सजविण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही रामकृष्ण मंगल कार्यालय चौक ते गावठाणदरम्यान बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. हलगी, कच्छी, घुमकं आदी सवाद्ये वाजवित बैलांच्या सजलेल्या जोड्यांनी डौलाने मार्गक्रमण केले.
सायंकाळी सहाच्या सुमारास बैलजोड्या घुंगरांचा निनाद करत मिरवणुकीत दाखल होताच जल्लोष झाला. यावेळी शिस्तबद्ध बँड, हलगी व सवाद्यांच्या गजरात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पैंजण - पैठण तर हिरा - राजा या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.

चक्क रथामधून मिरवणूक
जुनी सांगवी ः सांगवी-दापोडी परिसरात देखील शेतकऱ्यांचा प्रमुख सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोठा मालकांनी सकाळपासूनच बैलांना अंघोळ घालून, अंगाला तेल-उटणे लावून त्यांची सजावट केली. रंगीबेरंगी कापड, गंधाचे हार, गोंड्या, पितळी सजावटीच्या घंटा लावून बैलांना सजविण्यात आले. महिलांनी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे बैलांची आरती, पूजा व ओवाळणी करून सण साजरा केला प. पुरण पोळीचा नैवेद्य बैलांना खायला घालून दुपारनंतर सांगवी-दापोडी परिसरात मिरवणुका काढण्यात आल्या. शंभो ग्रुप बैलगाडा संघटना,
रुद्रा ग्रुप बैलगाडा संघटना, पाखऱ्या ग्रुप सांगवी, ग्रामदैवत श्री फिरंगाई देवी उत्सव बैलगाडा संघटना दापोडी, ओंकार आदींनी मिरवणुका काढल्या. शंभू ग्रुपने चक्क महादेव मूर्ती रथामधून बैलाची मिरवणूक काढली.
PIM25B20391

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : सरकारच्या लाडकी बहिण योजनेत चार हजार ९०० कोटींचा भष्ट्राचार; खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघाती आरोप

Pune Encroachment : आंदेकरच्या प्रभावक्षेत्रात अतिक्रमण कारवाई; माहिती देण्यास महापालिका अधिकाऱ्यांची टाळाटाळ

Pune News : थेट मुख्यमंत्र्यांनीच केली खड्ड्यांची तक्रार; पथ विभागाचे थाबे दणाणले

Pargaon News : पारगाव येथे ६५ वर्षीय जेष्ठाची झाडाला फाशी घेऊन संपविले जीवन

Gunaratna Sadavarte:'फक्त वंजाराचा माणूस म्हणून मुंडेंचा राजीनामा, सदावर्ते नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT