पिंपरी-चिंचवड

पिंपळे गुरवकरांचे श्रद्धास्थान श्री तुळजाभवानी देवी

CD

पिंपळे गुरव येथील मुख्य बस थांब्याजवळील रस्त्याच्या मधोमध श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. ही देवेची मूर्ती स्वयंभू असून देश स्वतंत्र होण्यापूर्वीची आहे.
देवींची मूर्ती स्वयंभू असून पूर्ण काळ्या पाषाणातील आहे. देवीला चार हात आहेत. मागील दोन हातांत ढाल व तलवार ही आयुधे आहेत. पुढील दोन हातांपैकी उजव्या हातात त्रिशूल महिषासुराच्या पोटात मारलेला असून डाव्या हातात महिषासुराची जीभ आहे. कदम घराण्यातील कै. राजाराम तुकाराम कदम (पाटील) यांना देवीचा दृष्टांत झाल्याने त्यांनी या ठिकाणी छोटी देवळी तयार करून या देवींची स्थापना करून पूजेस प्रारंभ केला.
हळूहळू काही वर्षानंतर १९८० च्या दशकात बदल होऊन देवळीचे चुना, माती, कौलारू मंदिरात रूपांतर झाले. त्यानंतर पिंपळे गुरव येथील कदम परिवारातील लोकांनी एकत्र येऊन १९९९ मध्ये तत्कालीन नगरसेवक कै. लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पायापूजन करून विटा, सिमेंट, वाळूचे मंदिर बांधले. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर श्री गगनगिरी महाराज यांच्या हस्ते माघ वद्य षष्ठी या दिवशी देवीची प्राणप्रतिष्ठा झाली. कालांतराने देवीच्या मूर्तीची झीज होऊ लागल्याने २०१४ मध्ये मूर्तीस वज्रलेप करण्यात आला. २०२१ पासून देवीची सेवा कदम परिवारातील तिसरी पिढी कीर्तनकार स्वप्नील (महाराज) श्रीकांत कदम यांच्याकडे आली. मंदिराचे व्यवस्थापन व देवींची सेवा कदम परिवाराकडे आहे.
नूतनीकरणामुळे मंदिराचा संपूर्ण कायापालट झालेला पाहावयास मिळत आहे. बाहेरून काळ्याभोर दगडांपासून घडविलेले मंदिर व सीमा भिंत, मंदिरात भिंतींवर ग्रॅनाईट फरशीचा वापर आदींनी सुसज्ज असे मंदिराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. मंदिरातील प्रवेशद्वारावर देवीचे वाहन सिंह तसेच दगडांपासून घडवून नव्याने उभारण्यात आलेली पंधरा फुटी दीपमाळ लक्षवेधी ठरत आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर सभोवताली भव्य मंडप टाकण्यात आला आहे. त्यावर रंगीबेरंगी विद्युत रोषणाईच्या माळा सोडण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही परंपरेनुसार देवीची विधिवत पूजा, देवीची सजावट, नऊ दिवसांची नऊ रूपे साकारण्यात येत आहे. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. अष्टमीला होमहवन, दसऱ्याच्या दिवशी गाव प्रदक्षिणा, कोजागरीला महाप्रसाद वाटप करण्यात येत असतो.
शब्दांकन ः विजय गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT