पिंपरी-चिंचवड

बीआरटीएस बसथांब्यासह मार्गाची दुर्दशा

CD

पिंपळे गुरव, ता. २७ ः पिंपळे गुरव येथील स्वराज गार्डन चौक परिसरातील बीआरटीएस मार्गावरील बस थांब्यावरील कठडा काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे तुटला असून त्याची दुरुस्ती न झाल्याने प्रवासी व पादचारी यांना धोका निर्माण झाला आहे. याच ठिकाणी बस मार्गालगत बसविण्यात आलेली लोखंडी सुरक्षा जाळी आणि दगडी दुभाजक देखील वाहनांच्या धडकांमुळे वाकलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत आहे.
दररोज हजारो प्रवासी बीआरटीएस मार्गाचा वापर करतात. त्यांना सुरक्षित सुविधा मिळणे अपेक्षित असताना, बसथांबा आणि त्याची सुरक्षा अर्धवट व जीर्णावस्थेत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, रिक्षा तसेच लहान वाहनचालकांसाठी हा भाग अपघातप्रवण बनला आहे. रात्रीच्यावेळी प्रकाश योजनेचा अभाव असल्याने हे तुटलेले दुभाजक वेळेत न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. अनेक वेळा दुचाकी घसरून अपघात झाल्याच्या घटना येथे घडल्या असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तत्काळ दुभाजक दुरुस्ती, कठड्यांची पुनर्बांधणी व जाळीचे काम करण्याची मागणी केली आहे. अपघात घडल्यावरच उपाययोजना करण्याची सवय न ठेवता यापूर्वीच धोका दूर करण्याची जबाबदारी महानगरपालिका व वाहतूक विभागाने पार पाडावी, अशी मागणी होत आहे.

काय आहे समस्या
- बसथांब्याचा कठडा तुटलेला
- लोखंडी जाळी, दगडी दुभाजक वाकलेली व तुटलेली
- दुचाकीस्वारांचे वारंवार अपघात
- प्रकाश योजनेचा अभाव
- प्रशासनाकडून दुरुस्तीची कोणतीही कारवाई नाही

या ठिकाणची पाहणी करून अपघातामुळे बीआरटी रस्त्यावर तुटलेल्या रेलिंगची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल.
- बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता, दळणवळण विभाग

PMG25B02820

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal News: Pune Police Raid मध्ये हाती काय सापडलं? निलेश घायवळ थेट इंग्लंडला रवाना | Sakal News

Sangola Heavy Rain : सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू

Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

टीम इंडियाने पाकिस्तानची पुन्हा जिरवली! Asia Cup Final च्या पूर्वसंध्येला केले अपमानित; वाचा काय घडले

Latest Marathi News Live Update: नागपूरमध्ये पावसाची हजेरी, विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस

SCROLL FOR NEXT