पिंपळे गुरव, ता. २२ ः पिंपळे गुरव आणि सांगवी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रभाग क्रमांक २९ आणि ३१ बरोबरच पिंपरी चिंचवड शहरामध्ये आरक्षित असलेल्या मोकळ्या जागांवर सशुल्क तात्पुरती वाहनतळ (''पे अँड पार्क'') सुरू करावा. त्यामुळे युवकांना रोजगार आणि महापालिकेला उत्पन्न मिळेल, असे मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत महापालिकेच्या वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पवार यांना निवेदन दिले आहे. यावेळी संजय गायके, किशोर अट्टरगेकर, मालोजी भालके, श्रीकृष्ण जाधवर, प्रताप भोसले आदी उपस्थित होते.
-----