पिंपरी-चिंचवड

श्री दत्तगुरू जयंती उत्सवाची तयारी सुरू

CD

पिंपळे सौदागर, ता. २९ : श्री स्वामी समर्थ अनंत मठ, शिवराजनगर रहाटणी येथे चार डिसेंबर रोजी श्री दत्तगुरू जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या धार्मिक तयारीचा आरंभ भक्तिमय वातावरणात झाला. मठ परिसरात पहाटेपासूनच गजर, मंत्रोच्चार व सुवासिक धूप-दीपांनी वातावरण मंगलमय बनले होते.
सुनीता अनंत पोतदार (काकी) यांच्या आशीर्वादाने व सूचनेनुसार, ॲड. विद्या पोतदार-पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सेवेकरी भोला काटे, सत्यम खंडागळे, पीयूष धानोरकर, राहुल पाटील, विवेक वसगडेकर आणि हितेश पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून श्री गुरूचरित्र पारायण विधिवत प्रारंभ झाले. या पारायणात भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत असून, पहिलेच दिवशी १२१ भक्तांनी उपस्थिती नोंदविली. यात महिला भाविकांचा सहभाग लक्षणीय आहे. गुरूपारायणाच्या कालावधीत अनंत मठ मुख्य शक्तिपीठातर्फे पारायणकर्त्यांसाठी दररोज चहा व प्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. पारायणाची सांगता तीन डिसेंबर रोजी होणार असून, त्यादिवशी विशेष पूजा, गुरूवंदना व आरतीचे आयोजन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: डोळे काढले, शरीरावर १५० जखमा अन्...; १४ वर्षीय प्रेयसीसोबत भयंकर कृत्य, ४८ वर्षीय प्रियकराने क्रूरतेच्या मर्यादा ओलांडल्या

IND vs SA: 'ऋतुराजला एका अपयशामुळे टीम इंडियातून काढू नका, मी हात जोडले...', माजी क्रिकेटरची विनंती

Army Jawan : देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या जवानाचा यथोचित सन्मान; सैनिकाच्या 'त्या' कृतीने जिंकली मने, असं काय केलं?

PMC Hoarding Fee : होर्डिंग शुल्क दरवाढीचा ठराव शासनाकडून रद्द; महापालिकेला मोठा झटका!

Pune Airport Traffic Update : विमानतळ परिसरात वाहतूक बदल; दोन मार्गांवर एकेरी वाहतूक लागू!

SCROLL FOR NEXT