पिंपरी-चिंचवड

शहराचा पाणीपुरवठा विस्कळित आजही पाणी वितरणावर वीस टक्के परिणाम होणार

CD

पिंपरी, ता. १८ : पवना धरण येथे हायड्रोसिस्टीम नादुरुस्त झाल्याने धरणातून सोडण्यात येणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे आज दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळित राहिला. मात्र, अद्यापही हायड्रोसिस्टीममधील जनरेटर पॅनेलमध्ये बिघाड दुरुस्ती न झाल्याने सुमारे १०० एमएलडी पाणी शहराला अपुऱ्या प्रमाणात मिळणार आहे. त्यामुळे, शहरात २० टक्के पाणी वितरणावर परिणाम होणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य व जपून करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

जलसंपदा विभागाकडून १७ तारखेला सकाळ ९ वाजल्यापासून जनरेटर पॅनेलमधील दुरुस्ती शोधण्याचे काम सुरु आहे. परंतु, अद्यापपर्यंत पॅनेलमध्ये बिघाडाचे कारण समजू शकलेले नाही. एकूण १२०० क्युसेक पाणीपुरवठ्यापैकी ४०० क्युसेकने पाणीपुरवठा जलसंपदा विभागाकडून सध्या सुरु आहे. १८ तारखेला रात्री ८ पर्यंत पॅनेलमधील बिघाड दुरुस्ती झाल्यास पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची चिन्हे आहेत. जलसंपदा विभागाचे एकूण १३ पंप आहेत. त्यातील दोन पंप सध्या बंद आहेत. त्यामुळे, १०० एमएलडी पाणीपुरवठा विस्कळित राहणार आहे. १९ तारखेला दुपारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.
--
रावेत बंधाऱ्यात पाणी येण्यास ३२ ते ३४ तास लागतात. काल (शुक्रवारी) सकाळी अकराला पाणी सोडले आहे. त्यामुळे, पाणी पातळी वाढण्यास वेळ लागणार आहे. वर्षातून कधी तरी अशी समस्या उद्भवते. उंच-सखल भागात पाणी वितरण कमी होण्याची चिन्हे आहेत. सर्व पंप चालू झाल्यास लवकरच नागरिकांना कळवले जाईल. सर्व पंप एकावेळी स्विचिंग करू शकत नाही. पंप चालू बंद करणे अवघड आहे, पाणीपातळी एक ते दीड इंचाने वाढल्यास लवकरच पंप सुरु करण्यात येणार आहेत.
- बाबासाहेब गलबले, सहशहर अभियंता, विद्युत विभाग
--
संपूर्ण शहराला २० ते २५ टक्के इतका पाणी वितरणात फरक पडेल. दुरुस्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत, पाणी पुरवठा विस्कळित राहील. शुक्रवारपासून दुरुस्ती सुरु आहे. सध्या ४०० क्युसेकने पाणी सोडले आहे. उर्वरित बिघाड दुरुस्ती झाल्यास पाणी येण्यासाठी ३६ तास लागतील. जर सर्व पंप सुरु राहिले तर, पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे सुरळीत होइल.
- श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग
--
सद्यःस्थिती
- रावेत बंधाऱ्यातून उपसा : ४८० एमएलडी
- एमआयडीसीकडून पाणी : ३० दशलक्ष लिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT