पिंपरी-चिंचवड

शरद पवार सुधारित

CD

फोटोः २६३७५
-------------------
पहाटेच्या शपथविधीने राष्ट्रपती राजवट उठली
पवार यांचा गौप्यस्फोट; चिन्हासकट पक्ष एखाद्या गटाला देण्याचा प्रकार पहिल्यांदाच

पिंपरी, ता. २२ ः ‘‘पहाटेचा शपथविधी झाला नसता तर; त्यावेळची राष्ट्रपती राजवट उठली नसती. तसेच; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते,’’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
शरद पवार यांनी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहरात सभा घेतल्या. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची राजकीय भूमिका, पिंपरी चिंचवडचा विकास आणि देशातील राजकीय स्थिती यावर परखड भाष्य केले. २३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधी गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आला आहे. या शपथविधीची शरद पवार यांना कल्पना होती, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ‘पहाटेच्या शपथविधीबाबत आपणाला आधी माहीत होते का? विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार याबाबत बोलत नाहीत. तुमची नेमकी भूमिका काय होती?, असे पत्रकारांनी विचारले असता, शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीमागील रहस्य उलगडले.
‘‘यापूर्वी देशात काँग्रेस, समाजवादी पक्षात फूट पडली पण आख्खा पक्ष चिन्हासकट एखाद्या गटाच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न यापूर्वी कधीच झाला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगाला काही मार्गदर्शन झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी महाराष्ट्रात फिरत आहे. नेते जरी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले असले तरी सामान्य कट्टर शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. याची माहिती मी घेतली आहे,’’ असे पवार यांनी यावेळी सांगितले.
पवार म्हणाले, ‘‘सत्तेचा गैरवापर करून शिवसेना फुटली. राजकीय पक्ष हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. तांत्रिक मुद्यांचा बागुलबुवा करत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोक त्यांना धडा शिकवल्याखेरीज राहणार नाहीत. सध्या हा निर्णय न्यायालयाच्या कक्षेत आहे. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. देशातील यापुढील प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन झालेले पहायला मिळेल. जनता बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यांनी त्रस्त झाली आहे. जनता परिवर्तनाला अनुकूल भूमिका घेईल.’’
----------------------
बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस
गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. त्यांच्याजवळ पाच- दहा मिनिटे थांबलो. त्यांच्या प्रकृतीवर ताण पडू नये म्हणून मी फार वेळ थांबलो नाही. याबाबत माझ्यापेक्षा अधिक चांगलेपणाने एकनाथ खडसे सांगतील, असे सांगून खडसे यांच्याकडे माईक सोपवला. त्यावेळी खडसे म्हणाले, ‘‘भाजपचे मी ४२-४५ वर्ष कार्य केले आहे पण अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्या काळातील भाजपमध्ये असे प्रकार घडत नव्हते.’’

विरोधकांना देशद्रोही ठरवण्याचा पायंडा
संजय राऊत आणि अशोक चव्हाण यांच्या जीविताला धोका असल्याचे त्यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. आपल्या विरोधी विचारांच्या नागरिकांना देशद्रोही ठरवण्याचा अनिष्ट पायंडा पाडला जात आहे. प्राध्यापक म्हणून आयुष्यभर काम करणाऱ्यांना, सामान्य आदिवासींचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न केले जात असल्याबद्दल पवार यांनी चिंता व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT