पिंपरी-चिंचवड

महिला दिनी उपक्रम

CD

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे
लक्ष द्यावे ः स्नेहा कलाटे

वाकड, ता. ११ : ‘‘कुटुंबसंस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलांचे कुटुंबीयांच्या आरोग्याकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते व त्यातून नकळतपणे काही आजार बळावतात. त्यामुळे महिलांनी थोडा वेळ स्वतः:च्या आरोग्यासाठी द्यावा, योगासने करावीत, योग्य सकस व पौष्टिक आहार घ्यावा तसेच वेळच्या वेळी आरोग्य तपासण्या करून स्वतःला सुदृढ ठेवावे,’’ असे आवाहन वाकड येथील रणजित (आबा) कलाटे फौंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे यांनी केले.
महिला दिनाचे औचित्य साधून वाकड व पिंपळे निलख येथील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना तसेच अण्णाभाऊ साठे नगर येथील महिलांना सॅनिटरी नॅपकिन पॅडचे वाटप फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका संगीता टिळेकर, प्रतिभा बनकर, विजया ढमाले, वसुंधरा कुलकर्णी, शबाना शेख, लता सुपे, मंदाकिनी करडे, सविता माने, शशिकला बाळसराफ, विशाखा भागवत, श्वेता अगरवाल, अशोक उनवणे, रामचंद्र पिसे त्याचबरोबर प्रशालेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कलाटे म्हणाल्या, ‘‘घरातील काम करण्यापासून नोकरी आणि करिअर घडविण्याचे काम महिला करतात, म्हणूनच त्यांना मल्टीटास्क असे म्हटले जाते. महिलांवर मुले व कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी असते तसेच त्या स्वतःची वैयक्तिक व व्यावसायिक ध्येय साध्य करण्यात देखील मग्न असतात. अशा व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक महिलांचे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

Prajwal Revanna : 'प्रज्वल' प्रकरणामुळे प्रचाराची दिशाच बदलली; काँग्रेस आक्रमक, JDS ऐवजी भाजप नेते रडारवर

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

Latest Marathi News Live Update : १५ जूनपर्यंत मालमत्ता कर भरल्यास मिळणार १०% सूट

SCROLL FOR NEXT