Bajaj Allianz Pune Half Marathon 2023  sakal
पिंपरी-चिंचवड

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : पुणे हाफ मॅरेथॉनसाठी पिंपरी-चिंचवडकरांचा कसून सराव

स्पर्धेत स्वतःची शारीरिक क्षमता तपासून पाहतानाच वैयक्तिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी नोंदविण्याचा प्रयत्न धावपटूंचा राहणार

सकाळ वृत्तसेवा

Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी पिंपरी-चिंचवडमधील धावपटू कसून सराव करत आहेत. स्पर्धेत स्वतःची शारीरिक क्षमता तपासून पाहतानाच वैयक्तिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी नोंदविण्याचा प्रयत्न धावपटूंचा राहणार आहे. सुमारे १०० हून अधिक धावपटू स्पर्धेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

पुण्यात रविवारी (ता.१०) बजाज अलियान्झ हाफ मॅरेथॉन होणार आहे. त्यासाठी ‘पीसीएमसी रनर्स’चे धावपटू शहराच्या विविध भागांत सराव करत आहेत. त्यामध्ये, वाकड, पिंपळे निलख, मोरवाडी, भोसरी आदी भागांचा समावेश आहे. इथे दररोज सकाळी एक ते दीड तासांपर्यंत हा सराव केला जात आहे. त्यामध्ये, स्ट्रेंग्थ ट्रेनिंगचाही अंतर्भाव आहे.

पिंपरी कॅम्प येथील धावपटू दीपक ओच्छानी म्हणाले,‘‘पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सलग तिसऱ्यांदा सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी मी माझ्या ४५ ते ५० वर्षे वयोगटांत द्वितीय स्थान मिळविले होते. यावर्षी वयोगटात थोडासा बदल झाल्याने स्पर्धेतील चुरस वाढेल. परंतु, यंदाही पदक मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील. बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन ही सर्वोत्तम स्पर्धांपैकी एक असून प्रत्येक वर्षी या स्पर्धेत सहभागी होण्याचा माझा प्रयत्न असतो.’’

वाकड येथील धावपटू प्रसन्नाप्रिया रेड्डी म्हणाल्या,‘‘पुणे हाफ मॅरेथॉनच्या दोन हंगामामध्ये मी भाग घेतला आहे. खूप चांगला अनुभव आला. राज्य आणि देशभरामधून बरेच नावाजलेले धावपटू येतात. त्यामुळे, स्पर्धेत कसोटी लागते. यंदाच्या स्पर्धेत वैयक्तिक पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा निर्धार आहे. माझा दररोजचा सराव आणि शारीरिक तंदुरुस्तीचे प्रयत्न योग्य पद्धतीने चालू आहेत अथवा नाहीत हे देखील मला स्पर्धेनिमित्ताने तपासून पहाता येणार आहे.’’

ॲथलेटिक्स ट्रॅक बंद असल्याने हिरमोड

इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलामध्ये शहरातील ॲथलेटिक्ससाठी एकमेव ट्रॅक आहे. तेथे शालेय खेळाडूंबरोबरच हौशी धावपटूही सराव करतात. परंतु, तेथे दुरुस्तीचे काम सुरु असल्याने ट्रॅक खेळाडूंसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे, पुणे हाफ मॅरेथॉनसाठी धावपटू इतरत्र सराव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: आई कुठे आहे बाबा? वडिलांचं उत्तर ऐकून मुलं सुन्न झाली… "मी तुमच्या आईला मारले, तिला पुरून टाका"

Sunil Bagul : व्हिडिओ हटविण्याच्या वादातून घरात घुसून मारहाण; बागूल यांची अटकपूर्व सुनावणी पुढे ढकलली

Latest Maharashtra News Updates : बोगस बियाण्यांविरुद्ध छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा

Nashik Citylink Bus : नाशिक सिटीलिंक बससेवेला ४ वर्षे पूर्ण; ८ कोटींहून अधिक प्रवासी, २४३ कोटींचा महसूल

Shravan Month 2025 Festivals List: श्रावण महिना- सणांचा थाट, आनंदाचा बहर, जाणून घ्या महत्त्व अन् श्रावण महिन्यात येणारे सण

SCROLL FOR NEXT