पिंपरी-चिंचवड

सिंहगड एक्सप्रेसमध्ये महिलांची भांडणे

CD

पिंपरी, ता. १२ : पुणे ते मुंबई सिंहगड एक्स्प्रेसमधील सर्वसाधारण व महिला पासधारकांच्या बोगींची संख्या कमी केली आहे. परिणामी, महिलाच्या बोगीत जागा मिळण्यावरून (सीट) हाणामारीची घटना वारंवार घडत आहेत. या आठवड्यात हाणामारीच्या दोन घटना घडल्याचे नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले. याप्रकरणी पासधारक महिलांनी कर्जत रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार दिली आहे.
नोकरी, व्यवसायानिमित्त सिंहगड एक्स्प्रेसने दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पिंपरी-चिंचवडमधून दररोज सुमारे दीड हजार नोकरदार प्रवास करतात. पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र बोगीची मागणी होती. त्यानुसार काही दिवस स्वतंत्र बोगी मिळाली. त्याचप्रमाणे पासधारक महिलांसाठी स्वतंत्र व सर्वसाधारण बोगींची सुविधा दिली. मात्र, कोरोनानंतर दोनही बोगी कमी केल्या. त्यामुळे रोज कामावर जाताना पासधारक महिलांना जागा मिळण्यावरून इतर प्रवाशांचे वाद होत आहेत. अनेकदा त्याचे पर्यावसान हाणामारीत होते. सध्या एकच बोगी आहे. त्यामध्ये पासधारक महिला आणि इतर सर्व प्रवासी बसतात. पासधारक महिलांसाठी स्वतंत्र बोगींची मागणी आहे.

ठाणे, कल्याणला त्रास
मुंबई सीएसटी वरून सुटणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेसमध्ये ठाणे आणि कल्याणचे प्रवासी बसतात. त्यांना लोकलची सोय असतानाही जबरदस्तीने बसतात. याबाबत जाब विचारल्यास दादागिरी करून वाद घालतात, मारहाण करतात, असे शहरातील महिला प्रवाशांनी सांगितले.

अशा घडल्या घटना...
एक : गुरुवारी (ता. ६) मुंबईहून पुण्याला येताना
दोन ः सोमवारी (ता. १०) पुण्याहून मुंबईला जाताना शिवाजीनगर स्टेशन सिहगड एक्सप्रेस डी-११
तीन ः मंगळवार (ता. ११) सायंकाळी ४.३७ वाजता दादर ते ठाणे दरम्यान प्रगती एक्स्प्रेस

हाणामारीबाबत रेल्वे प्रशासनास अनेक वेळा तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जाते. महिलांच्या बोगीत पुरुषही बसतात. सिंहगड एक्सप्रेसच्या सर्वसाधारण व महिलांसाठीची बोगी कमी केल्याने घटना वाढल्या आहेत. बोगी पूर्ववत कराव्यात.
- इक्‍बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी-चिंचवड

ठाण्याच्या हद्दीत महिलांमध्ये भांडणे झाली आहेत. या भांडणात एकीच्या चेहऱ्यावर नखे ओरबडली गेली आहेत. त्यांचा तक्रार अर्ज ठाणे पोलिस स्टेशनकडे पाठवला आहे.
- संभाजी यादव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, कर्जत
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Mark Boucher on Rohit Sharma : रोहित अन् मुंबईचं नात संपणार? MIच्या मुख्य कोचने केला मोठा खुलासा

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

SCROLL FOR NEXT