पिंपरी-चिंचवड

सीए हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा - चंद्रकांत पाटील

CD

सीए हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा ः चंद्रकांत पाटील

पिंपरी, ता. ८ ः सीएचे कार्य फक्त प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याइतकेच मर्यादित राहिले नसून, आज सीए हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा बनला आहे. असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. निगडी येथील आयसीएआय पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ज्ञान संवाद या सीए विद्यार्थी परिषदेत ते बोलत होते.
यावेळी सीए इंस्टिट्यूटचे केंद्रीय कौन्सिल सदस्य मंगेश किनरे, सहायक शहर अभियंता मनोज शेठिया, परिषद संचालक पियुष छाजेड, रिजनल कौन्सिल विकास अध्यक्षा पिंकी केडीया, रिजनल कौन्सिलचे माजी सदस्य अशोककुमार पगारिया, आयसीएआय पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष सचिन बंसल, उपाध्यक्ष पंकज पाटणी, विकास अध्यक्ष वैभव मोदी, अक्षय बाहेती, खजिनदार शैलेश बोरे, सचिव सारिका चोरडिया, माजी अध्यक्ष विजय बामणे, कार्यकारी सदस्य सचिन ढेरंगे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘आपले आयुष्य सुखकर व्हावे या हेतूने आपण अभ्यासक्रम निवडतो जेणेकरून उत्तम सरकारी नोकरी, पगार, मिळावा. मात्र, आज प्रशासकीय सेवेत नोकरी करून एक देशसेवा किंवा समाजसेवा करावी या हेतूने नोकरी निवडत नाही. ही शोकांतिका आहे. पूर्वी नोकरशाही पद्धत रूढ होती. मात्र, आता गरीब घरातील देखील तरुण नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळत आहेत. व्यवसाय वाढल्याने देश सक्षम बनत आहे. सीए ने व्यवसाय जोपासताना सामाजिकता जपली पाहिजे. परिषदेत देशभरातून ५०० सीए विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक भाषण विकासाचे अध्यक्ष वैभव मोदी यांनी केले. सूत्रसंचालन रुची बंसल, निधी कट्टी यांनी तर आभार पंकज पाटणी यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : पठ्ठ्याने भररस्त्यात पेट्रोल ओतून जाळली रिक्षा, पत्नी अडवत ओक्साबोक्सी रडली तरीही थांबला नाही... धक्कादायक कारण समोर

T20 World Cup 2026 साठी कांगारुंचा मास्टर प्लॅन! स्पर्धासाठी १५ जणांचा संघ जाहीर; कमिन्सचे पुनरागमन, पण कर्णधार कोण?

Viral Video: नवीन वर्षाच्या सुरुवातीला सिद्धीविनायक बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, रांग पाहून बसेल धक्का

Tobacco Excise Duty: सिगारेट आणि पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! नवा कर लागू होणार; पण कधीपासून? तारीख आली समोर

Maharashtra SSC Exam Schedule 2026: तयारीला लागा! SSC बोर्ड परीक्षा 2026 वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला कोणता पेपर

SCROLL FOR NEXT