Sakal vastu Property Expo Sakal
पिंपरी-चिंचवड

Sakal Vastu Property Expo : स्वप्नातील घर निवडण्यासाठी आयटीयन्सची पसंती वाकड, पिंपळे निलखला

‘पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे भागाचा वेगात विकास होत आहे. गगनचुंबी गृहप्रकल्प इमारती साकारत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - मुंबई-बंगळूर अर्थात देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गामुळे वाकड व पिंपळे निलख ही गावे मुख्य प्रवाहात आली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची त्यांना साथ मिळाली. हिंजवडी आयटी पार्कमुळे ‘डिमांड’ वाढली. महापालिकेने रस्त्यांचे जाळे विणले. कनेक्टिव्हिटी वाढली. सोईसुविधा आल्या.

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या वेगवेगळ्या भागात जाण्यासाठी पीएमपी बससेवा सुरू झाली. आलिशान सदनिकांचे गृहप्रकल्प साकारू लागले आणि आयटीयन्ससह अन्य नोकरदार, व्यावसायिकांनीही पसंती दिली. आजही बहुतांश नागरिक घर घेण्यासाठी या भागाला पसंती देत आहेत.

मुळा नदीच्या कुशीत वसलेली गावं म्हणजे वाकड व पिंपळे निलख. सुपीक जमीन. साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वी शेती होती. आता मुख्य ठिकाणं व बाजारपेठ झाली आहे. ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर विकासाची वाटचाल करू लागली. कालांतराने हिंजवडी आयटी पार्क झाले. त्यामुळे गावाचा ‘भाव’ वाढला.

आयटीयन्सनी राहण्यासाठी पसंती दिली. मोठमोठे गृहप्रकल्प साकारू लागले. काहींनी गुंठ्याने जागा घेऊन घरे बांधली. आता स्मार्ट सिटी व अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. उर्वरित शेतीवरही गृहप्रकल्प साकारू लागले आहेत.

शिवाय, सांगवी-रावेत बीआरटी, नाशिक फाटा-वाकड बीआरटी, औंध-हिंजवडी मार्ग, मुंबई-बंगळूर महामार्ग, पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे आणि अंतर्गत प्रशस्त रस्ते यामुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे. मोठमोठे मॉल्स, मल्टिस्पेशालिटी रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल्स अशा सुविधांमुळे या भागातील घरांना मागणी वाढली आहे.

‘पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे भागाचा वेगात विकास होत आहे. गगनचुंबी गृहप्रकल्प इमारती साकारत आहेत. नवनवीन ॲमिनिटीज दिल्या जात आहेत. या भागात रस्ते चांगले आहेत. नवीन रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे.

आयटीयन्सचा घर घेण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो’मुळे ग्राहकांना एकाच छताखाली अनेक प्रकल्पांची माहिती मिळणार आहे. स्वप्नातील घर निवडण्याची संधी त्यांना असेल.’

- नरेंद्र अगरवाल, संचालक, ऐश्वर्यम ग्रुप

उद्यापासून ‘प्रॉपर्टी एक्स्पो’

स्वातंत्र्य दिनानिमित्त घर घेण्याची चांगली संधी ‘सकाळ’ने ग्राहकांसाठी आणली आहे. मनासारखं घरांची माहिती एकाच छताखाली मिळावी, यासाठी शनिवार (ता. १२) आणि रविवारी (ता. १३) ‘प्रॉपर्टी एक्स्पो’ आयोजित केले आहे.

डांगे चौकाजवळ ताथवडे येथील सिल्‍व्हर बॅंक्वेट हॉलमध्ये ‘एक्स्पो’ असेल. त्यात वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, हिंजवडी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर परिसरातील घरांचे पर्याय असतील. एकाच ठिकाणी अनेक बांधकाम प्रकल्पांची अर्थात ‘प्रिमियम प्रापर्टी’ची आणि वन बीएचकेपासून थ्री, फोर बीएचकेपर्यंतच्या घरांची माहिती मिळेल.

काय? कधी? कुठे? केव्हा?

काय? : सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो

कुठे? : सिल्व्हर बॅंक्वेट हॉल, रावेत बीआरटी रस्ता, डांगे चौकाजवळ, रामनगर, ताथवडे

कधी? : शनिवार व रविवार अर्थात १२ व १३ ऑगस्ट २०२३

केव्हा? : सकाळी ११ ते रात्री ८ (दोन्ही दिवस)

प्रवेश व पार्किंग : विनामूल्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT