Ashadhi Wari 2023  esakal
पिंपरी-चिंचवड

Ashadhi Wari 2023 : उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन वैष्णव मार्गस्थ, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला पिंपरी-चिंचवडमधून भक्तिभावाने निरोप

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात मुक्कामी पोचला होता.

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Wari 2023 - पहाटेचं आल्हाददायक वातावरण, दिंड्यांमधून ऐकू येणारे अभंगांचे स्वर व दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी असं चित्र सोमवारी पिंपरी-चिंचवडमध्ये दिसले. निमित्त होते, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे. आकुर्डी येथील मुक्काम संपवून सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात मुक्कामी पोचला होता. रात्री पालखी तळावर कीर्तन झाले. त्यानंतर जागर झाला. सोमवारी (ता. १२) पहाटे पाच वाजता सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. तत्पूर्वी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत मंदिरात महापूजा झाली. काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला.

पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. खंडोबा माळ चौकातून सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला. साडेसातच्या सुमारास पालखी खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. दिंड्याही थांबल्या. तिथे न्याहरी केल्यानंतर सोहळा पुढे निघाला.

साडेअकराच्या सुमारास पालखी दापोडी येथे पोहोचली. दुपारची विश्रांती घेतल्यानंतर हॅरीस पुलावरून पुण्यातील बोपोडीत प्रवेश केला. आकुर्डीपासून दापोडीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पारंपारिक वेशभूषा केलेले नागरिक व महाविद्यालयीन तरुणाई पालखीजवळ सेल्फी व फोटो काढताना दिसले. स्थानिक नागरिकांकडून वारकऱ्यांना चहा व नाश्‍ताचे वाटप केले. भक्तीमय वातावरणात पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी पालखीला निरोप दिला.

दरम्यान, महापालिकेतर्फे आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. पर्यावरणपूरक, प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. महापालिकेच्या शाळा व खाजगी ठिकाणी दिंड्यांची व्यवस्था केली होती. आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून देताना प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक केली होती. पालखी सोहळ्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका व अग्निशमन बंब आणि जवान आहेत.

साहित्यिकांची दिंडी
पिंपरी-चिंचवडमधील साहित्यिकांनी देहूरोड कमानीपासून आकुर्डीपर्यंत दिंडी काढली. संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, वासुदेव, संत जनाबाई अशी वेषभूषा केली होती. हातात वीणा, टाळ-चिपळ्या आणि डोक्यावर तुळस घेऊन अभंग, भक्तिगीते गात वाटचाल केली. संतवचने, पर्यावरण संवर्धनाची घोषवाक्ये आणि स्वरचित भक्तिगीतांच्या ओळींचे फलक घेऊन ‘ज्ञानोबा माउलीऽ तुकारामऽऽ’, ‘जय जय रामकृष्ण हरी’ असा जयघोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT