पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी आजपासून शाळा सुरू, शिक्षक-कर्मचाऱ्यांची लगबग

CD

पिंपरी, ता. १४ ः दीड महिन्याच्या सुटीनंतर गुरूवारपासून (१५ जून) शाळा सुरू होणार आहेत. नवीन वह्या पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत आणि पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांमध्ये वर्ग खोल्याची स्वच्छता, साफसफाईची लगबग अनेक शाळांमध्ये बुधवारी (ता. १४) पहायला मिळाली.

उन्हाळी सुटीनंतर २०२३-२४ शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी शाळांना शिक्षण विभागाकडून विविध सूचना देण्यात आल्या. शाळा १५ जूनपासून सुरू होतील, असे पूर्वीच सांगण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत, शाळांची स्वच्छता, सौंदर्यीकरण करायचे आहे. त्यासह शाळांमधून उदबोधन वर्ग घेतला जाणार आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू होण्याच्यापूर्वीच पाठ्यपुस्तके, गणवेशांचे नियोजन केले आहे. ‘शाळा पूर्व तयारी’ अभियानही सुरू आहे. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळा स्तरावर झाले असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरात महापालिका शाळांमध्ये यंदा ४० हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात येणार आहे.

शाळा परिसरात प्रभात फेरी
शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत शाळेचा परिसर स्वच्छ करावा. सकाळी ७ ते ७.३० या वेळेत शाळा परिसरात प्रभात फेरी काढावी. त्यानंतर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन, त्यांचे स्वागत करावे. सकाळी दहाला परिपाठ घेण्यात यावा. त्यानंतर अध्यापनास सुरवात करावी, अशा सूचना महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

एक लाख विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच
शहरात २०२३-२४ शैक्षणिक वर्षात ९९ हजार ३९१ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे संच उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले. मेच्या शेवटच्या आठवड्यात बालभारतीकडून पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाने उन्नत केंद्रनिहाय त्याचे वितरण केले. शाळा स्तरावर पाठ्यपुस्तके पोचले असून, विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके मिळतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील ६०० शाळांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी गर्दी
गुरुवारपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. शाळा सुरू होत असल्याने शहरातील स्टेशनरी दुकानांवर शालेय साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांना पसंत पडणाऱ्या स्कूलबॅग, वॉटरबॅग, शूज, वह्या खरेदी करण्यास पालक प्राधान्य देत होते. शाळेचा पहिला दिवस जवळ आल्याने शालेय साहित्याची जमवाजमव सुरू झाली आहे. बाजारपेठेमध्ये साहित्य खरेदीसाठी बच्चेकंपनीसह पालकांची गर्दी झाली होती. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांसह त्यांचे पाल्यांची लगबग पहायला मिळाली.


कोट
‘‘शाळापूर्व तयारीच्या सूचना खासगी आणि महापालिका शाळांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे नियोजन केलेले आहे.’’
-संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar News: 'महाबळेश्वरमध्ये मध्यरात्री टपरीवर कारवाई'; आचारसंहितेचा फायदा घेत व्यावसायिकाचा प्रताप; प्रशासनाने डाव हाणून पाडला

Beed Heavy Rain: आता तरी आम्हाला मदत मिळणार का? शेतकऱ्यांचा केंद्रीय पथकाला सवाल, येवलवाडी परिसरात केली पाहणी

Nashik Kumbh Mela : कुंभमेळा कामांना आचारसंहितेचा अडसर नाही! त्र्यंबकेश्वरमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण; आयुक्त शेखर सिंह यांची माहिती

Pune News: 'काचळवाडीला जेरबंद बिबट्याचा सुटकेसाठी दोन बिबट्यांकडून प्रयत्न'; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Girish Mahajan : नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरण : "जागेचा मोबदला मिळेल," गिरीश महाजन यांचे आश्वासन; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

SCROLL FOR NEXT