पिंपरी-चिंचवड

नवीन कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यास सुरुवात पोलिसांना प्रशिक्षण

CD

पिंपरी, ता. २ : ब्रिटिश काळापासून चालत आलेले तीन फौजदारी कायदे सोमवारपासून (ता.१) कालबाह्य झाले असून त्यांच्या जागी नवीन तीन कायदे लागू झाले आहेत. त्यांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या कायद्याच्या बदलाबाबत पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवीन कायद्यानुसार पहिला गुन्हा हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भारतीय दंड संहितेतील कलमे जवळपास तोंडपाठ झाले आहेत. परंतु, आता नवीन कायद्यातील कलमांचा क्रम व त्यातील कायदेशीर तरतुदी स्मरणात राहण्यासाठी त्याचे सतत वाचन करणे आवश्यक आहे. या नव्या कायद्यातील शिक्षा व तरतुदींचाही पोलिसांना अभ्यास करावा लागणार आहे.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे तीन नवीन कायदे लागू झाले आहेत. तर भारतीय दंड संहिता (आयपीसी), द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन कायदे कालबाह्य झाले आहेत. दरम्यान, नवीन कायद्यांची माहिती व्हावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

दोन टप्प्यांत प्रशिक्षण
पहिल्या टप्प्यात निगडी येथील मुख्यालयात सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथील विधी निर्देशक पौर्णिमा नाईक व संजय पाटील यांनी पोलिसांना मार्गदर्शन केले. त्यानंतर, पोलिस उपायुक्त यांनी परिमंडळ अंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाण्यातील अंमलदारांना प्रशिक्षण दिले. मागील काही दिवसांपासून मुख्यालय तसेच पोलिस ठाणे येथे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर पोलिस उपायुक्तांना पुण्यातील पोलिस संशोधन केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

हिंजवडीत पहिला गुन्हा दाखल
नवीन कायद्यानुसार पोलिस आयुक्तालयांतर्गत हिंजवडी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भरधाव टेम्पोने एका महिलेला धडक दिल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. गंगाराम प्रल्हाद चव्हाण (रा. मुंबई) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पोचालक मधुकर ईश्वर जावेर (वय ५०, रा. जाधववाडी, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांची पत्नी, मुलगी इशिका, खुशी, यशोदा यांच्यासोबत मालाडवरून आल्यानंतर सोमवारी (ता. १) पहाटे तीनच्या सुमारास वाकड येथील भूमकर चौकात रस्त्याच्या कडेला रिक्षाची वाट पाहत थांबले होते. दरम्यान, मुंबईच्या दिशेने भरधाव येणाऱ्या जावेर याच्या टेम्पोने इशिका हिला धडक दिली. त्यामध्ये ती जखमी झाली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ (ब) मोटार वाहन कायदा १८४, ११९/१७७ या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच भोसरी, चिखली या पोलिस ठाण्यामध्येही सोमवारी नवीन कायद्यानुसार विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT