पिंपरी-चिंचवड

डासांची उत्पत्तीस्थळे आढळल्यास दंड महापालिका आयुक्तांची माहिती; तपासणीची अधिकाऱ्यांना सूचना

CD

पिंपरी, ता. १० ः डेंगी किंवा किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांची तपासणी करून, डासोत्पत्ती स्थळे तत्काळ नष्ट करावीत. तसेच डासांच्या अळ्या आढळलेल्या ठिकाणांच्या जागा मालकांवर आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
डेंगीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत आयुक्त सिंह बोलत होते. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उपआयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी डेंगी जनजागृती कृती आराखड्याबाबत माहिती दिली. साप्ताहिक उपाययोजनांमध्ये सर्व महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये जनजागृती उपक्रम, रुग्णालयाबाहेर आणि आतील भागातील स्थळांची पाहणी करणे, पॅम्फ्लेट वाटप, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका, सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये जनजागृती, पथनाट्ये, शिबिरांचे आयोजन, सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये जनजागृती उपक्रम, डेंगी जागरूकता व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिप, प्रजनन स्थळांची तपासणी, पॅम्फ्लेट वाटप, पोस्टर स्पर्धा, व्याख्याने, शालेय रॅली तसेच गणेश मंडळे, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक मंच यांचा उपक्रमात सहभाग वाढविण्याचे आवाहन डॉ. गोफणे यांनी केले.

उपाययोजनांबाबत आयुक्तांच्या सूचना
- शहरातील खाजगी शाळा, महाविद्यालये, बांधकामाची ठिकाणे, खाजगी दवाखाने व रुग्णालये, झोपडपट्टी, प्रशासकीय कार्यालये, नागरी आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी डेंगी किंवा किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करावी.
- डेंगी, मलेरिया प्रतिबंधक मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, नागरिकांच्या घरांच्या कंटेनरचे सर्वेक्षण करणे, व्यवसायाच्या ठिकाणी वेळोवेळी पाहणी करणे यांसारख्या उपाययोजना कराव्यात. घरात आणि बाहेर स्वच्छ पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती होत असते, शिवाय घरातील फ्लॉवर-पॉट, मनी प्लांट्स आणि फ्रिज ड्रिप पॅनमधील पाण्यात देखील अशी उत्पत्ती आढळून येते. यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सोशल मीडियाच्या किंवा इतर प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करावी.
- क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रतिबंधात्मक मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी पथकांमार्फत खासगी आस्थापना, बांधकामे, मोकळी मैदाने, शहरातील विविध उद्याने, भंगाराची किंवा इतर मोठी दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांची पाहणी करून डासोत्पत्ती ठिकाणे आढळलेल्या ठिकाणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करा.
- लोकप्रतिनिधी, शहरातील कलाकार, प्रसिद्ध खेळाडू यांना डेंगी जनजागृती कृती आराखड्यामध्ये सहभागी करून घेऊन चित्रफिती तयार कराव्यात.
- सोशल मीडिया हॅन्डल्सद्वारे जनजागृती करा, डेंगी प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देण्यासाठी पोस्टर्स, बॅनर्स, भित्तिपत्रके, पॅम्प्लेट्स वितरित करा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : राज्यातले सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी सक्षम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT