पिंपरी-चिंचवड

वरिष्ठ महिला हॉकीसाठी वैष्णवी फाळकेकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

CD

पिंपरी, ता.१० ः हॉकी महाराष्ट्र आणि पुनीत बालन ग्रुप यांनी संयुक्त विद्यमाने, बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र महिला संघातील विद्यमान हॉकीपटूंचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच १४ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी मधल्या फळीतील खेळाडू (मिडफिल्डर) वैष्णवी फाळके हिच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाची घोषणाही करण्यात आली.
हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संघटक सचिव मनोज भोरे, हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस आणि संयोजक मनिष आनंद, ध्यानचंद पुरस्कार विजेत्या स्मिता शिरोळे, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्लेरेन्स लोबो, शहर काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा पूजा आनंद आणि हॉकी महाराष्ट्रचे सीओओ आणि सहसंयोजक मेहेर प्रकाश तिवारी उपस्थित होते.
भोरे यांनी खेळाडूंच्या समर्पण आणि चिकाटीबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्र हॉकीची योग्य दिशेने वाटचाल सुरु असून हा खरोखरच अभिमानाचा क्षण असल्याचे नमूद केले. तर
मनिष आनंद यांनी खेळाडूंच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. तसेच आपल्या संघात कौशल्य भरपूर आहे. हॉकीचे आजचे हे लखलखते तारे असून इतरांसाठी मोठे उदाहरण ठरले असल्याचे गौरवोद्‍गार काढले.
या कार्यक्रमात हॉकी महाराष्ट्रकडून कनिष्ठ आणि वरिष्ठ गटात देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या रजनी टिमरपु, वैष्णवी फाळके, अक्षता ढेकळे आणि ऋतुजा पिसाळ या चार खेळाडूंचा सत्कार केला. तसेच विविध शिबिरांमधून निवड प्रक्रियेसाठी सहभागी झालेल्या सात महिला हॉकीपटूंनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये, मनुश्री शेडगे, प्रियांका वानखेडे, काजल आटपाडकर, हिमांशी गावंडे, शशी प्रभा, अश्विनी कोळेकर आणि भावना खाडे यांचा समावेश आहे.
१४ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धेसाठी हॉकी महाराष्ट्रचे सरचिटणीस मनिष आनंद यांच्या हस्ते संघाच्या जर्सी व किटचे अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र महिला हॉकी संघ पुढील प्रमाणे -
गोलरक्षक - सुश्मिता पाटील, रजनी एतिमारपू; बचाव फळी - निर्जला शिंदे, ऐश्वर्या दुबे, शशी प्रभा चतुर्वेदी, अक्षता ढेकळे; मधली फळी - वैष्णवी फाळके (कर्णधार), भावना खाडे, दुर्गा शिंदे, मनश्री शेडगे, शालिनी साकुरे, दीक्षा अवघडे; आघाडीची फळी - हिमांशु गावंडे, काजल आटपाडकर, आकांशा सिंह, प्रियांका वानखेडे, योगिता बोरा, ऋतुजा पिसाळ.
PNE24U07144

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Khadakwasla Dam : ‘खडकवासल्या’त सर्वोच्च पाणीसाठा, तेरा वर्षांतील उच्चांकी; धरणक्षेत्रात पावसाचा दिलासादायक परिणाम

Viral Video: रशियन महिलेने प्राणी संग्रहालयात नको ते कृत्य केलं... पाहणारे ही संतापले, व्हिडिओ व्हायरल

UPSC 2024 : ‘यूपीएससी’तील यशस्वितांचा गौरव; प्रशासकीय सेवेत आवड महत्त्वाची : माजी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

SCROLL FOR NEXT