पिंपरी-चिंचवड

‘आरटीई’ पालकांचा मतदानावर बहिष्कार

CD

पिंपरी, ता. ११ : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायदा अंतर्गत प्रवेशासाठी आरटीई जनजागृती महासंघ व वेगवेगळ्या आरटीई पालक संघटनांमार्फत आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. नागरिकांच्या भावना शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोचवल्या. मात्र, शासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे निषेध म्हणून ‘आरटीई’ पालकांनी येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे, अशी माहिती आरटीई जनजागृती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विजय रंदिल यांनी दिली.
आरटीई शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य सरकारने काढलेला सुधारित अध्यादेश उच्च न्यायालयाने रद्द केलेला आहे. त्यामुळे सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आरटीई योजना अंतर्गत पुन्हा येणार आहेत. चुकीच्या पद्धतीने झालेले प्रवेश प्रक्रिया परत सुरु करण्यात येणार असल्याचा आदेश राज्य शिक्षण विभागाने लवकरात लवकर काढावा. आरटीई शिक्षण हे आठवीपर्यंत मोफत दिले जाते व नववी व दहावीसाठी उच्चशुल्क आकारण्यात येते. गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शुल्क भरता येत नसल्यामुळे त्यांना शाळा अर्धवट सोडावी लागते. नववी व दहावीपर्यंत शिक्षण घेण्याची तरतूद करावी, अशी पालकांची मागणी आहे.

‘‘सरकार आमच्या विविध मागण्याकडे लक्ष देत नाही. आरटीई कायदा पूर्णपणे संपुष्टात आणण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकणार आहे.’’
- इरफान शेख, पालक, काळेवाडी.


संघटनांकडून प्रमुख मागण्या...

- ज्या शाळांनी स्वतःला अल्पभाषिक म्हणून स्वतःला वेगळे केले आहे. अशा शाळांनासुद्धा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गंत सामील करून घ्यावे.
- सर्व महापालिका शाळा या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सीबीएससी पॅटर्न आधारित कराव्यात.
- शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भेदभाव न करता, सर्वांना समान प्रकारचा प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम मिळावा.
- गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील वि‌द्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षण हे ५० टक्के आरक्षणावर श्रेणीसुधारित करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Students Protest : MPSC विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये एल्गार, रस्त्यावर येत सरकारविरोधात केल्या घोषणाबाजी

Shocking News : पोपटाच्या मृत्यूने दु:खात बुडाला मालक, मृत पक्षी घेऊन थेट कलेक्टरकडे पोहोचला अन् केली 'ही' मागणी, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीमध्ये मनसे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Sangli Election : प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या ‘पायावर डोके’; सांगलीत निवडणूक प्रचाराला भावनिक वळण

Pune Municipal Election : पुण्यात भाजपचा पहिला नगरसेवक; मनिषा नागपुरे यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT