पिंपरी, ता. ९ ः चित्रपट सृष्टीतील आघाडीचे नाव म्हणजे ‘बिग बी’ अमिताभ बच्चन. शनिवारी (ता. ११) त्यांचा ८३वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ‘सकाळ माध्यम समुहा’ने सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या आवाजात ‘बिग बीं’चे संगीतमय अभीष्टचिंतन करण्यासाठी ‘सुदेश भोसले लाइव्ह’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन काळेवाडीतील रागा पॅलेस येथे शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी केले आहे.
भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील प्रभावशाली अभिनेत्यांपैकी ‘बिग बी’ एक आहेत. गेली सहा दशके त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. दूरचित्रवाणी वाहिनीवरील सूत्रसंवादक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांच्या विविध चित्रपटांतील भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी आजही सर्व वयोगटांतील रसिकांच्या मनात घर करून आहेत. प्रत्येकजण ती गाणी गुणगुणत असतो. त्या गाण्यांना सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या आवाजाचा साज लाभणार आहे. त्यांच्या समवेत सहगायक मकरंद पाटणकर यांच्या आवाजाची जादूही रसिकांना ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे सुरेल स्वरांनी भारून टाकणारा ‘सुदेश भोसले लाइव्ह’ कार्यक्रम पिंपरी-चिंचवडकरांसाठी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक रामा ग्रुप आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, रविराज रिॲलिटी ॲण्ड गोविंद ग्रुप, नैवेद्य थाली रेस्टॉरंट हे सहप्रायोजक आहेत.
कार्यक्रमाविषयी....
- सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्यासमवेत सहगायक मकरंद पाटणकर यांचा सहभाग
- ‘बिग बी’ यांच्या शैलीत गाणारे व संवादफेक करणारे सुदेश भोसले यांचे असंख्य चाहते
- तिकिटांची सोय BookMyShow वर उपलब्ध
- चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी ९ ते ११.३० सायंकाळी पाच ते ८ दरम्यान तिकीट विक्री
- अमिताभ बच्चन यांच्या अजरामर गाण्यांच्या आठवणींना उजाळा मिळणार
हे लक्षात ठेवा
काय? ः सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या आवाजात ‘बिग बीं’ना वाढदिवसानिमित्त संगीतमय सलामी
कधी? ः शुक्रवार, १० ऑक्टोबर २०२५
केव्हा? ः सायंकाळी ६.३० वाजता
कुठे? ः रागा पॅलेस, काळेवाडी (एम्पायर इस्टेट सोसायटीजवळील संत मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळ)
‘‘किशोर कुमार, लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी अजरामर झाली आहेत. किशोरकुमार यांची गायनशैली अनोखी होती. वेगवेगळ्या पद्धतीने ते गायचे. सुंदर आणि गोड आवाज त्यांचा होता. त्यांच्या आवाजासह अन्य गायकांनी गायलेली आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेली गाणी सुदेश भोसले आणि मकरंद पाटणकर सादर करणार आहेत. असा संगीतमय महान कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल ‘सकाळ’ला धन्यवाद!
- अभिनंदन सांकला, व्यवस्थापकीय संचालक, रविराज रिॲलिटी
‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यांचा अभिनय, दमदार आवाजातील संवाद प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. त्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सकाळ’ने अनोखा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला आहे. या माध्यमातून बच्चन यांचे अभीष्टचिंतन केले जाणार आहे. रसिकांसाठी ही सांगीतिक मेजवानी अविस्मरणीय ठरणार आहे.
- भक्तबंधु पढी, संचालक, नैवेद्य थाली रेस्टॉरंट
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.