पिंपरी-चिंचवड

डॉजबॉल स्पर्धेत मुलीचा संघ उपविजेता

CD

पिंपरी, ता. २६ : जिल्हास्तरीय डॉजबाल स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यमाच्या मुलींच्या संघाने अटीतटीच्या सामन्यात द्वितीय क्रमांक पटकविला. पिंपरी चिंचवड डॉजबॉल असोसिएशन व पुणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशन यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
असोसिएशनचे अध्यक्ष सत्यवान वाघमोडे यांनी डॉजबॉल खेळाचा इतिहास मुलांना सांगितला आणि खेळाचे महत्त्व सांगितले. हिंदुस्तान अँटिबायोटिक्स हायस्कूलचे क्रीडा शिक्षक मुकेश पवार यांनी यांनी मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शालेय जीवनातील खेळाविषयी महत्त्व पटवून दिले. सचिव प्रा. रामेश्वर हराळे यांनी मुलांना पुढे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संघाच्या या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, हायस्कूलचे चेअरमन दीपक मराठे, व्हिजिटर प्रा.अतुल फाटक, मुख्याध्यापिका गौरी सावंत, यांनी खेळाडूंचे कौतुक केले. मधुकर रासकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालक शिक्षक संघाच्या सभासद मेघना बनसोडे यावेळी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Auction Live: ३० लाखांहून थेट १.३ कोटी! गावातून आलेली २१ वर्षीय पोरगी झाली कोट्याधीश; कोण आहे Shree Charani?

Mokshada Ekadashi 2025: मोक्षदा एकादशी कधी आहे? जाणून घ्या व्रताचे नियम आणि फायदे

Latest Marathi News Live Update : बोदवडमध्ये बनावट नोटांच्या तस्करीचा संशय; ग्रामस्थांनी चार जणांना केली मारहाण

WPL 2026 Auction Live: मुंबई इंडियन्सचा अजब डाव! ५.७५पैकी एकाच खेळाडूवर खर्च केले ३ कोटी; कोण आहे ती?

पुण्यातील बँकेत चक्क दर्शनासाठी होतेय भाविकांची गर्दी, 3.5 किलो सोन्याच्या दत्त मूर्तीचं वर्षातून एकदाच दर्शन, 60 वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT