पिंपरी, ता. २७ ः पावसाळ्यामुळे सर्वत्र पाणी साचणे व ओलसरपणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंगी व मलेरियासारख्या आजारांचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने डास निर्मूलन मोहिमेला गती दिली आहे. अंगणांत, छपरांवर, बांधकाम स्थळांवर, भंगाराची ठिकाणी, टाक्यांमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी कीटकनाशक फवारणी, घरे व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी करून जनजागृती आणि दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे.
डेंगी आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ म्हणून पाळावा आणि घराभोवती साचलेले पाणी काढून टाकावे, असे आवाहन आरोग्य विभाग उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे. शहरातील तपासणीमध्ये १२ हजार ८१४ घरे आणि १३ हजार ८६४ कंटेनरमध्ये डोसोत्पत्ती स्थळे आढळून आली आहेत. याप्रकरणी तीन हजार ९५३ नोटीस पाठविल्या असून ९८८ नागरिक व आस्थापनांवर ३५ लाख ८१ हजार रुपये दंड वसूल केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
अशी केली तपासणी
घरे ः ८१,३२,०८९ पैकी १२,८१४ घरांमध्ये डासोत्पत्ती
कंटेनर ः ४३,३२,५३० पैकी १३,८६४ कंटेनरमध्ये डासोत्पत्ती
भंगार दुकाने ः १,७०३
बांधकाम स्थळे ः १,९९९
प्रतिबंधात्मक उपक्रम
- नियमित औषध फवारणी
- घरोघरी माहितीपत्रके वितरण
- विद्यार्थ्यांसाठी जनजागृती प्रशिक्षण
- प्रभागस्तरावर विशेष जनजागृती
- सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा
पावसामुळे डेंगी-मलेरियाचा धोका अधिक वाढतो. या पार्श्वभूमीवर औषध फवारणी, आरोग्य तपासण्या, औषध उपचार यासह सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील पाणी साचू देऊ नये आणि स्वच्छता राखावी. डेंगीसदृश लक्षणे दिसल्यास त्वरित महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.