पिंपरी, ता. ९ : महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे २६ जवानांच्या विशेष पथकाने नुकतेच कोलाड येथे पूर स्थितीतून सुटका करण्याचे (फ्लड रेस्क्यू) प्रशिक्षण पूर्ण केले. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात आपत्तीजनक स्थिती निर्माण झाल्यास तेथे तातडीने मदत करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान वाहत्या पाण्यात पोहणे, वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात पोहण्याचे कौशल्य, जीवनरक्षक जॅकेटशिवाय पोहणे, तसेच वाहत्या पाण्यातून बोटींवर सुरक्षितपणे चढणे याचा सराव घेण्यात आला. या शिवाय कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी त्वरित प्रतिसाद कसा द्यावा, याचेही मार्गदर्शन करण्यात आले. ‘रेस्क्यू टेक्निक्स’ आणि विविध पद्धतींचा सराव करून जवानांना कठीण परिस्थितीत प्रभावी बचावकार्य कसे करावे हे शिकवण्यात आले.
बचावानंतरचे प्राथमिक उपचाराचे साहित्य उपलब्ध नसल्यास वस्तूंचा वापर करून मदत कशी करावी, पाण्यात अपस्मार (झटके येणे) उद्भवल्यास कोणते उपाय करावेत, बुडालेल्या व्यक्तीला वाचवताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, हे जवानांना शिकवले. जीव वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. ‘ब्रेन स्ट्रोक’ किंवा हृदय विकारासारख्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत योग्य उपचार करता येऊ शकतो, याचेही प्रशिक्षण दिले.
प्रामुख्याने ‘सीपीआर’ तंत्र, कृत्रिम श्वाच्छोश्वास तंत्राचा सखोल अभ्यास घेतला. लहान मुले, प्रौढ व्यक्तींना ‘सीपीआर’ देण्याच्या पद्धतींची माहिती दिली. सर्पदंश झालेल्या जखमी व्यक्तीचे रक्तस्राव थांबवण्यासाठी प्रेशर पॉइंट्सचा वापर कसा करावा, बँडेज कसे बांधावे, याचेही प्रात्यक्षिक दाखवले. जखमींची सुरक्षित हालचाल कशी करावी, त्यांना कमीत कमी वेदना होतील, याची काळजी घेत हातपाय पकडून कसे उचलावे. रुग्णवाहिका येईपर्यंत कोणते उपचार करता येतील, कोणती कृती तत्काळ जीव वाचवू शकते, आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत, याबाबतही मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.