पिंपरी-चिंचवड

- ३० सप्‍टेंबर अखेर होणार वाटप

CD

पिंपरी, ता. ९ : पिंपरी-चिंचवड शहरात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना पाच सप्‍टेंबर पासून धान्यवाटप सुरू झाले आहे. ३० सप्‍टेंबर पर्यंत धान्‍याचे वाटप केले जाणार आहे. सोमवार वगळता उर्वरित सर्व दिवशी धान्‍याचे वाटप होईल. याचा शिधापत्रिकाधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अन्‍न धान्‍य वितरण व परिमंडळ कार्यालयाने केले आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने धान्य वाटपाची प्रक्रिया गतिमान केली आहे. शहरातील २५३ स्‍वस्‍त धान्‍य दुकानांतून वितरण सुरू आहे. सुमारे साडे तीन लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना धान्य दिले जात आहे. ‘अ’ व ‘ब’ गटातील शिधापत्रिकांवर लाभधारकांना गहू व तांदूळ दिला जात असून, ‘अंत्योदय’ व ‘अन्न सुरक्षा’ गटातील कुटुंबांना गहू, तांदूळ आणि ज्वारी मिळत आहे. धान्य घेण्यासाठी लाभार्थ्यांना आधारकार्ड व शिधापत्रिका दाखवावी लागणार आहे. धान्य वितरणाचे तांत्रिक अडथळे टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती उपाययोजना केली आहे. धान्य उचलताना नागरिकांनी शिध्याची पावती तपासून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. धान्याचा पुरवठा पर्याप्त प्रमाणात असून, ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना शिधा घेता येणार आहे. सोमवारी सुरू झालेल्या या प्रक्रियेमुळे शिधापत्रिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.
धान्‍य घेताना बायोमेट्रिक पद्धतीने नोंदी ठेवण्यात येणार आहेत. त्‍यामुळे संबंधित लाभार्थ्यानेच उपस्‍थित असणे आवश्‍यक आहे. नागरिकांनी ठरविलेल्‍या वेळेतच धान्‍य उचलावे असे आवाहनही पिंपरी कार्यालयाचे परिमंडळ अधिकारी प्रदीप डांगरे यांनी केले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT