पिंपरी, ता. ९ ः ‘आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तरुणांनी खडतर मेहनत घेतली पाहिजे. आपली ओळख निर्माण करण्यासाठी नेहमी झटून प्रयत्नशील राहावे,’ असे आग्रही प्रतिपादन सुप्रसिद्ध किर्तनकार यांनी केले. तरुणांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यिन नेहमीच अग्रेसर असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
निमित्त होते सकाळ माध्यम समुहाच्या ‘यिन’च्या ११व्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे. यानिमित्त ‘युथ नेक्स्ट जेन’’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. एस. बी. पाटील एमबीए महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी पिंपरी चिंचवड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, रावेतच्या प्राचार्य डॅा. स्मिर्ती पाठक, एस. बी. पाटील कॅालेज ॲाफ आर्किटेक्चर, निगडी प्राधिकरणच्या प्राचार्य डॅा. स्मिता सुर्यवंशी, रावेतच्या पिंपरी चिंचवड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इस्प्रित कौर, एस. बी. पाटील कॅालेज ॲाफ आर्किटेक्चरचे प्रा. ऋतुराज कुलकर्णी, प्रा. प्रमोद संकपाळ, तळेगावच्या इंद्रायणी विद्यालय मंदिराचे प्रा. सत्यजीत खांडगे, रसिकलाल माणिकचंद धारीवाल इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्यूटिकल एजुकेशन अँड रिसर्च, चिंचवडच्या ग्रिश्मा पाटील, प्रा. रुपाली कुदरे, महाविद्यालयाच्या यिन प्रतिनिधी काजल माहेश्वरी आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘माणसाने मुक्तपणे व्यक्त झाले पाहिजे, म्हणजे कुठल्याही प्रकारे आजार जडत नाही. त्यामुळे मोकळेपणाने बोलायला शिका.’’
समन्वय समितीमध्ये धारा राठौर, अनुष्का मुकरे, प्रगती मसाळ, सारा शेख, प्रणव भोसले, दर्शन येडगे, साहिल टिंगरे, ऋतिक कांबळे, सिद्धी ढमाले, निधी ठाकूर, भूमिका गडलिंग, संस्कृती पवार, हर्षदा बाबर, श्रावणी दहीहंडे, रोहन हुलावळे, दिग्विजय फाळके, सुनिधी कांबळे, सोहेल शेख, ऋषीकेश पवार यांनी संयोजन केले. सुहानी सोरटे हिने गणेश वंदना सादर केली. संयोजन अनिकेत मोरे यांनी केले.
किर्ती धारवाडकर म्हणाले, ‘‘यिन उपक्रम वाखाणण्याजोगा आहे. यिनमुळे उपक्रमात तरूणांची ऊर्जा रुपांतरीत होत आहे.’’
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन रिसर्च अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. संतोष खलाटे, ओतुरच्या आण्णासाहेब वाघिरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी मनोगत व्यक्त केले.
पीसीईटीचे डिजीटल मार्केटिंग हेड केतन देसले म्हणाले, ‘‘यिनमधून विद्यार्थी घडले आहे. यिन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. अनेक विद्यार्थ्याची यशोगाथा यिनच्या पुस्तकात मांडली आहे.’’
प्रास्ताविक श्यामसुंदर माडेवार यांनी केले. प्रभंजन नलावडे यांनी सुत्रसंचालन केले.
---
आजच्याघडीला विद्यार्थ्यांना करीअरच्या अनेक संधी उपलब्ध आहे. सकाळ यिनच्या माध्यमातुन युवापिढी घडत आहे. रस्ता सुरक्षा या उपक्रमात युवकांनी मुख्य भूमिका बजावली पाहिजे. कारण रस्ता सध्या सर्वाधिक मृत्यु हे रस्ता अपघातात घडत आहेत. तरूणांनी जबाबदारीने वागले पाहिजे.
- पवन नव्हाडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
----
‘भारत हा तरूणांचा देश आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात युवकांची संख्या सर्वाधिक आहे. युवकांनी ऊर्जेचा वापर केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय ही संकल्पना शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. एआयची भीती बाळगू नका. ‘एआय ’ मध्ये अनेक संधी आहेत.
- तेजोनिधी भंडारे, मुख्य व्यवस्थापक, रिलायन्स ॲनिमेशन
-----