पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

कासारवाडी रेल्वे स्थानकावर असुविधा
केंद्र सरकारच्या अमृतकाल योजनेअंतर्गत पुणे ते लोणावळा रेल्वे स्थानके कात टाकत आहेत. कुठे प्लॅटफॉर्म रुंद करणे चालू आहे; तर काही स्थानकांवर लिफ्ट व सरकता जिने बसविण्यात येत आहे. पण, सुशोभीकरण सोडा. पण साध्या आवश्यक सुविधाही कासारवाडी रेल्वे स्थानकावर नाहीत. स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नाही. बाके सुद्धा चोरीला गेले आहेत. स्थानकाबाहेर उभ्या वाहनांमुळे बाहेर पडणे ही अवघड जाते. तिकीट बुकिंग मशिन बंद अवस्थेत आहे. स्थानकात लावलेले लोखंडी कुंपण तुटले आहे. प्लॅटफॉर्म वरील शेड वाढवणे, बसण्यासाठी बाकांची संख्या वाढवणे, स्वच्छतागृहे दोन्ही बाजूला वापरण्यायोग्य करणे या सुविधा द्यायला हव्यात.
- सुनील ढोबे, मोशी
E25V44792


कुलूपबंद स्वच्छतागृहाने गैरसोय
महापालिका स्वच्छ सर्वेक्षणाच्या जाहिराती करत आहे. त्याप्रमाणे चिंचवड येथील केएसबी चौकातील स्वच्छतागृह बाहेरून रंगरंगोटी करून स्वच्छ सुंदर बनविण्यात आले आहे. परंतु हा केवळ दिखावा असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे स्वच्छतागृह कुलूपबंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हे स्वच्छतागृह महापालिकेचे की कोणाचे खासगी आहे ? महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह असल्यास कुलपात बंद करून ठेवण्याचे आदेश कोणी दिलेले आहेत. कोणाला जबाबदारी दिलेली आहे. स्वच्छतागृह उघडण्याची आणि बंद करण्याचे निश्चित वेळापत्रक लावण्यात यावे.
- बी.एस.पाटील, संभाजीनगर
PNE25V44787

मोरवाडी येथील खड्डा त्वरित बुजवा
महापालिका भवन येथे मोरवाडी ग्रेट सेपरेटर पुलाखाली येथे तीन ते चार फूट असा चौकोनी खड्डा पडला आहे. पुलाखाली अंधार असल्यामुळे तो दिसून येत नाही. सर्वात जास्त त्रास दुचाकी चालकांना होतो. पर्यायाने सर्व वाहनांचा वेग मंदावतो. महापालिकेच्या संबंधित विभागाने त्याची दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी.
- रुपेश बाळकृष्ण धनवे, दळवीनगर, चिंचवड
PNE25V44791

अधिकृत नामफलक लावून द्यावा
वडमुखवाडीमधील ताजणे मळा येथे प्रेम मन्नत सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये अनेक कुटुंबे वास्तव्यास असून सार्वजनिक व शासकीय कारणांसाठी सोसायटीची ओळख सहज होण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर नामफलक असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, सध्या सोसायटीच्या प्रवेशद्वारावर कोणतीही अधिकृत नामफलक नाही. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना तसेच शासकीय अधिकारी, टपाल विभाग व इतर सेवा पुरवठादारांना योग्य पत्ता शोधण्यात अडचण निर्माण होत आहे. सोसायटीसाठी अधिकृत पद्धतीने नामफलक लावून देण्यात यावा.
- निर्गुण थोरे, चऱ्होली
PNE25V44786

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Terrorist Module Exposed: मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; पाच राज्यांमध्ये छापे अन् पाच संशयित दहशतवाद्यांनाही अटक!

Mumbai Metro: मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; रिझर्व्ह बँकेसोबत भूखंड विक्रीचा करार पूर्ण

Latest Marathi News Updates Live : मंगळवेढा पोलिसांनी शोधलेले मोबाईल मालकांच्या ताब्यात

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT