पिंपरी-चिंचवड

बीआरटी, बसथांबे दुरुस्तीसाठी ‘तू-तू-मैं-मैं’

CD

पिंपरी, ता. ११ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बससाठी उभारण्यात आलेल्या ‘बीआरटी’ (बस रॅपिड ट्रान्झिट) मार्गिका आणि स्थानकांची देखभाल-दुरुस्ती कोणी करायची? यावरून महापालिका आणि पीएमपीएमएल प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवित आहेत. प्रशासकीय समन्वयाअभावी बीआरटी मार्गिकेचे काम रखडले असून, याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून ‘पीएमपी’ बससाठी ‘बीआरटी’ मार्गिका बांधल्या. पण, त्यातील थांब्यांची दुरवस्था झाली आहे. त्याची दुरुस्ती कोणी करायची, यासाठी दोन्ही प्रशासनांत ‘तू-तू-मैं-मैं’ सुरू आहे.
‘‘सुरुवातीला पायाभूत सुविधा उभारणे हे आमचे काम आहे. बीआरटी स्थानके ‘पीएमपी’कडे हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती हे ‘पीएमपी’चे काम आहे. त्यांनी सुरक्षा रक्षक काढल्यामुळे बीआरटी स्थानकातील वस्तू चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे दुरवस्थेला तेच जबाबदार आहेत. आम्ही त्यांना दरवर्षी तुटीपोटी कोट्यवधी रुपये देतो. त्यामुळे ही देखभाल-दुरुस्ती ‘पीएमपी’ने करणे आवश्यक आहे,’’ असा दावा महापालिका सहशहर अभियंता माणिक चव्हाण यांनी केला आहे.
तर, ‘‘बीआरटी स्थानके ही महापालिकेची संपत्ती आहे. त्याची देखभाल-दुरुस्तीचे काम त्यांचे आहे,’’ असा दावा ‘पीएमपीएमएल’ प्रशासन करत आहे.

बीआरटी स्थानकांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी दोन्ही महापालिकांची आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका पीएमपीएमएलला संचलन तूट देतात.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल


आकडे बोलतात...
५२ कि.मी. : बीआरटी मार्गिकांची लांबी
४११ : दररोज धावणाऱ्या बस
४,७३६ : दररोजच्या बसफेऱ्या
२.५ लाख : दररोजचे सरासरी प्रवासी

शहरातील बीआरटी मार्ग
१. निगडी-दापोडी
२. सांगवी फाटा-किवळे
३. नाशिक फाटा-वाकड
४. काळेवाडी फाटा- चिखली
५. दिघी-आळंदी फाटा

बीआरटी थांब्यांतील समस्या
- बहुतांश थांब्यांतील दिवे बंद
- प्रवाशांना रात्री अंधारातच थांबावे लागते
- सुरक्षा रक्षकांच्या केबिन दरवाजांची चोरी
- एलईडी माहिती फलक, स्वयंचलित दरवाजांची चोरी
- अपघात टाळण्यासाठी बसविलेले रोलर तुटलेले
- छत, बाके, बॅरिकेड्सचे लोखंडी अडथळे तुटले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

SCROLL FOR NEXT