पिंपरी-चिंचवड

शहर परिसरातील गुन्हे वृत्त

CD

चिंचवडमध्ये रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला
पिंपरी : चिंचवड येथील विद्यानगरमधील गोल्डन चौक परिसरात एका गुंडाने रिक्षा उभी करण्यासाठी चालकाकडे खंडणीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने आरोपीने रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (ता. ९) रात्री घडली. या प्रकरणी आसिफ इक्बाल खान (वय ४३, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हसन सलीम शेख ऊर्फ हसन्या (रा. चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी त्यांच्या वडिलांच्या रिक्षात बसले होते. तेव्हा, आरोपी कोयता घेऊन आला आणि म्हणाला की, ‘वडिलांची आणि भावाची रिक्षा गल्लीत पार्क करायची असेल; तर महिन्याला १००० रुपये दे.’ त्याला नकार दिल्यावर आरोपीने त्यांना जिवे ठार मारण्याच्या इराद्याने डोक्यात कोयता मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने हात पुढे करून तो वार अडवला.

ताथवडे येथील हॉटेलमध्ये तोडफोड
पिंपरी : ताथवडे परिसरात हॉटेलमध्ये घुसून सहा गुंडांनी एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून हॉटेलमध्ये तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (ता. ९) सायंकाळी ताथवडे येथील बिस्मिल्ला केटरर्स ॲण्ड बिर्याणी हाऊसमध्ये घडली.
या प्रकरणी शादाब सलीम अली (वय २५, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रेम विजय कांबळे (वय १९, रा. थेरगाव), राजवर्धन अधिकराव भोसले (वय १९, रा. चिंचवड), करण ज्ञानेश्वर खंदारे (वय २०, रा. साईनाथनगर) आणि कृष्णराज संतोष परसे (वय २०, रा. साईनाथनगर) यांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी व त्यांचे मामा सिराज आणि इतर कामगार हॉटेलमध्ये काम करत होते. त्यावेळी सहा अनोळखी इसम हॉटेलमध्ये आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मामाला धमकी देत दहशत निर्माण केली. मामावर कोयत्याने वार केले. तसेच हॉटेलमधील फ्रिज व काचेचे काऊंटर तोडून दहशत पसरवली.

वाकडमध्ये ११ लाखांची फसवणूक
पिंपरी : वाहन विकून करून त्याचे अकरा लाख रुपये वाहन मालकाला न देता फसवणूक करण्यात आली. ही घटना ११ आणि १२ मार्च या कालावधीत वाकड येथील रघुवीर कार हब येथे घडली.
या प्रकरणी अजय सिद्राम कोसके (वय ६७, रा. हिंजवडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर सुभाष जाधव (वय ४२, रा. घोटावडे, मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने त्यांची महिंद्रा कंपनीची एक्सयुव्ही ३०० (एमएच १२/टीएन ७५८५) वाहन विक्रीसाठी आरोपीकडे दिले. आरोपीने ते मोहम्मद गफूर शेख या व्यक्तीला परस्पर विकून त्याचे पैसे घेतले. आरोपीने आरटीओ प्रक्रियेच्या नावाखाली फिर्यादीकडून ओटीपी घेऊन ती शेखच्या नावावर करून दिली.

गुंतवणुकीच्या बहाण्याने २९ लाखांना गंडा
पिंपरी : ‘ब्लॉक ट्रेडिंग’मध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका गुंतवणूकदाराची २९ लाख ४१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २३ जुलै ते २८ ऑगस्ट या कालावधीत चिखली येथील मधुर अपार्टमेंटमध्ये घडली.
अनुपम प्रदीप गुळवेलकर (वय ४०, रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विविध बँक खात्यांचे धारक आणि अनोळखी व्यक्ती अशा एकूण दहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींनी फिर्यादीला ‘ब्लॉक ट्रेडिंग’मध्ये जास्त फायदा होईल, असे सांगितले. त्यानंतर एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांना ॲड केले. फिर्यादीकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये २९ लाख ४१ हजार रुपये घेत त्यांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली.

मालवाहतूकदारावर गुन्हा दाखल
पिंपरी : मिंडा कंपनीचे मटेरियल देशाच्या विविध शहरांमधून सावरदरी आणि महाळुंगे येथील प्लांटमध्ये पोहोचविण्यासाठी मालवाहतूकदाराकडे दिले. मात्र, ते कंपनीकडे पोहोच न करता स्वतःकडे ठेऊन कंपनीचे नुकसान केले. ही घटना एप्रिल ते १८ जुलै या कालावधीत महाळुंगे व सावरदरी येथे घडली.
या प्रकरणी सचिन पांडुरंग देठे (वय ४८, रा. मोशी प्राधिकरण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार
ए-केअर ट्रान्सपोर्ट कंपनीचे सीईओ मनोज नायर आणि इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने मिंडा कंपनीच्या सावरदरी आणि महाळुंगे येथील प्लांटसाठी ५४ लाख ६० हजार ४३० रुपयांचे सामान ए-केअर ट्रान्सपोर्ट कंपनीकडे सोपवले होते. जुन्या बिलांची थकबाकी असल्याचे कारण देऊन आरोपींनी ते सामान थांबवून ठेवले.

व्यापाऱ्याची ४१ लाखांची फसवणूक
पिंपरी : लोखंडी पत्रे विकत घेण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची ४१ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १६ एप्रिल ते २३ मे या कालावधीत चिखली येथील एस. आर. स्टील ट्रेडर्स या गोदामात घडली.
या प्रकरणी अब्दुल्लाह रुबाबअली सय्यद (वय ४६, रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागजी राम (रा. कराड, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नागजी रामने फिर्यादीकडून लोखंडी पत्रे विकत घेत असल्याचे भासवून ४१ लाख ५ हजार ३९७ रुपयांचा माल घेतला. मात्र, त्याने त्या मालाचे पैसे दिले नाहीत आणि फसवणूक केली.

भांडण पाहणाऱ्या तरुणाला मारहाण
पिंपरी : दोन गटांतील भांडणे पाहत असताना एका तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (ता. ९) सायंकाळी नखाते वस्ती, रहाटणी येथे घडली. या प्रकरणी अनुज सचिन प्रधान (वय १९, रा. काळेवाडी फाटा) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रणव दुर्गे (रा. रहाटणी), अथर्व दुर्गे (रा. रहाटणी), शैलेश साळवे आणि गठ्ठ्या (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये आपापसांत भांडणे सुरू होती. तेव्हा, फिर्यादी तेथे थांबून पाहत होते. आरोपींपैकी एकाने फिर्यादीजवळ येऊन ‘तू काय बघत थांबला आहेस’ , असे म्हणत त्यांच्या कानशिलात मारली. त्यानंतर फिर्यादीने त्यांचा भाऊ अथर्वला बोलावून आरोपीला जाब विचारला असता आरोपींनी त्यांना दगडाने, काठीने आणि रबरी पाईपने मारहाण केली.

हिंजवडीत ‘एमडी’ ड्रग्स जप्त, दोघे अटकेत
पिंपरी : हिंजवडी परिसरात ८० हजार रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ बेकायदेशीररित्या जवळ बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (ता. १०) पहाटे मारुंजी रोड येथे घडली.
जीतनारायण जगतनारायण दुबे (वय २७, रा. हिंजवडी) आणि प्रदीप साहासिंग राजपूत (वय २७, रा. हिंजवडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई गणेश कर्पे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींच्या ताब्यात ८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन (एमडी) हे अमली पदार्थ, तीन मोबाईल फोन आणि एक ॲक्टिव्हा गाडी असा एकूण १ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. त्यांनी हे अमली पदार्थ मुंबई येथील चेतन नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे सांगितले.


घरगुती वादातून मेहुण्यावर कोयत्याने हल्ला
पिंपरी : घरगुती कारणावरून मनात राग धरून एका व्यक्तीने त्याच्या मेहुण्यावर कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. ९) तळेगाव-चाकण रोडवरील वाघजाई फाट्याजवळ घडली.
या प्रकरणी निलेश त्रिंबक तळेले (वय ४३, रा. चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धीरज प्रल्हाद गारसे (रा. चिखली) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने मोटारसायकलवरून येऊन फिर्यादीवर कोयत्याने डाव्या हातावर वार केले. त्यामुळे फिर्यादी गंभीर जखमी झाले.

गॅस सिलिंडरची अवैध विक्री, एकावर गुन्हा
पिंपरी : भोसरी येथे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची अवैध विक्री केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १०) सायंकाळी भगत वस्ती, भोसरी येथे करण्यात आली.
महेश माधवराव मोरे (वय ३२, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई ज्ञानेश्वर साळवे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी महेश मोरे हा बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे गॅस सिलिंडर खरेदी करून मोठ्या टाक्यांमधून छोट्या ४ किलो वजनाच्या टाक्यांमध्ये धोकादायकरित्या गॅस रिफिल करत होता. त्याच्याकडून ३३ हजार ६०० रुपयांचा अवैध गॅस साठा व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

वृक्षतोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
पिंपरी : मावळ तालुक्यातील सुदवडी येथे बेकायदेशीररित्या वृक्षतोड केल्याबद्दल एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घडली.
या प्रकरणी सुरेश काळू रावते (वय ४२, रा. आंबेगाव, जि. पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंडियन लॉजिस्टीक दिल्ली प्रा. लि. या कंपनीचे सीईओ प्रदीप कुमार नवल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नवल याने सुदवडी येथील नमूद गट नंबरमध्ये कोणतीही परवानगी न घेता अवैध वृक्षतोड केली. याबाबत सुरेश रावते यांनी पाठपुरावा करून गुन्हा नोंदवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT