पिंपरी-चिंचवड

दिंडीतून मतदानाचा जागर

CD

पिंपरी, ता. २७ : ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देत टाळ-मृदंगाचा गजरात महापालिकेच्या वतीने चिखली येथील संतपीठ परिसरात मतदान दिंडी काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराने मतदान करणे हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचा संदेश देण्यात आला.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना जागरूक करण्यासाठी महापालिकेमार्फत ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत मतदान जागृती मोहीम राबविली जात आहे. वारकरी परंपरेचा साज चढविलेले विद्यार्थी, टाळ-मृदुंगाच्या गजरात व भक्तिरसाने भारलेल्या वातावरणात शाळेच्या परिसरातून निघालेली मतदानाची दिंडी गृहनिर्माण सोसायट्या, कॉलनी येथे गेली. या ठिकाणी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे, असे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या. यावेळी संतपीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘हक्क आपल्या मतदानाचा’ हे प्रेरणादायी गीत सादर केले. उपस्थितांना मतदानाची शपथ देण्यात आली. दिंडीत शाळेचे विद्यार्थी, महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: दोन सुपर ओव्हर झालेल्या सामन्यानंतर मोहम्मद नबीला ICC कडून झाली शिक्षा! काय झालेली चूक?

Pune Cyber Fraud : ड्रेनेज दुरुस्त करायला आलेल्या व्यक्तीने ७ कोटी लुटले, पुण्यात सायबर चोरीचा नवा चक्रावणारा प्रकार समोर

Kolhapur Wild Animal : अवघ्या ७ वर्षीय राजवीरचा बळी गेला, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याबाबत काय केलं; सर्किट बेंचकडून राज्य सरकारला विचारणा

बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो...! पूजा सावंतचे अदा पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या डान्सचा viral video

Amravati Crime: खून करून कालव्यात जाळला मृतदेह; जहानपूर येथील घटना ,वाहनाच्या टायरचे निशाण

SCROLL FOR NEXT