पिंपरी-चिंचवड

जादा परताव्याच्या आमिषाने ३४ लाखांची फसवणूक

CD

पिंपरी : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून ३३ लाख ९६ हजार ७३८ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑनलाइनद्वारे घडला. या प्रकरणी दिग्विजय सुरेश सुतार (रा. नारायणनगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्‍हा दाखल केला आहे. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना फोन करून क्रिप्टो करन्‍सीमध्‍ये गुंतवणूक केल्‍यास ३० ते ४० टक्के परताव्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला गुंतवणुकीच्या पैशांवर काही रक्कम देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून विविध खात्यांवर मोठी रक्कम जमा करून घेतली. फिर्यादीने गुंतवणूक केलेले पैसे मागितले असता आरोपींनी आणखी पैशांची मागणी केली. यामध्ये फिर्यादीची एकूण ३३ लाख ९६ हजार ७३८ रुपयांची फसवणूक केली.

तडीपार गुंडाला कोयत्‍यासह अटक
पिंपरी : तडीपार आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या गुंडाला कोयत्यासह पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपरीतील एच. ए. मैदान परिसरात करण्यात आली. शाहरुख नईम शेख (रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी एच. ए. मैदानाजवळ कोयता घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून कोयता जप्त केला.

जुगारप्रकरणी पाच जणांवर कारवाई
पिंपरी : जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई निगडीतील अजंठानगर परिसरात करण्यात आली. योगेश सोनावणे, नामदेव समिंदर, भास्कर सांबळे, सिद्धार्थ सुकाळे, रामदास गायकवाड अशी गुन्‍हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून एक हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकोल्यात युती तोडण्याचे खापर कोणावर फुटणार? महायुतीतील भाजप सावध भूमिकेत : शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या भूमिकेवर 'वेट अँड वॉच'

Mumbai News: मुंबईत घरांच्या किमती गगनाला! नोकरदारांची अर्धी कमाई हप्ते फेडण्यावर; धक्कादायक अहवाल समोर

Vijay Stambh Tribute : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पूर्वतयारीत गती; प्रशासनाची विशेष तयारी!

Video: मुंबईकडून खेळले दोन रोहित शर्मा? हिटमॅनसारखा दिसणारा तो क्रिकेटपटू नक्की आहे तरी कोण, जाणून घ्या

Raigad Traffic Congestion : रायगड जिल्ह्यात वाहतूक कोंडी; खराब रस्त्यांमुळे पर्यटन व्यवसाय संकटात!

SCROLL FOR NEXT