पिंपरी-चिंचवड

श्रीकांत आपटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

CD

पिंपरी, ता. २९ ः अवयवदान व देहदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या श्रीकांत आपटे यांना रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. चिंचवड रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला. पिंपरीत झालेल्या कार्यक्रमात रोटरी क्लबचे प्रकल्प संचालक राजेश अग्रवाल उपस्थित होते.
आपटे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ‘शोक समुपदेशन केंद्रा’चे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मृत अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन करून त्यांना अवयवदानासाठी प्रेरित करण्याचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १५० हून अधिक जनजागृती कार्यक्रम, ६२ देहदान, ६८ नेत्रदान व २५ त्वचादानांचे यशस्वी समन्वय साधण्यात आले आहेत. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राजेंद्र पोफळे, यतीश भट, महावीर सत्याना, सचिन वाडबुगर यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैताग आलाय, लोक विचारतायत, बायको विचारतेय...; भाजपच्या निष्ठावंताला अश्रू अनावर, उमेदवारी नाकारल्यास आत्मदहनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : सोलापुरात शिवसेना ठाकरे गटातील धुसफूस चव्हाट्यावर

Winter Pregnancy Care: हिवाळ्यात गर्भातलं बाळही थंडी अनुभवतं! आई आणि बाळ सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Virat Kohli नवीन वर्षातही खेळणार विजय हजारे ट्रॉफीतील सामना, पण कधी आणि कोणाविरुद्ध? जाणून घ्या

Bus Accident : भीषण अपघातात बसमधील पाच प्रवासी जळून खाक; ओळख पटवणं झालं होतं मुश्किल, दोघांचं ठरलेलं लग्न अन् काळाचा...

SCROLL FOR NEXT