पिंपरी-चिंचवड

उद्योगनगरीची वर्षाची तृष्णा तृप्त

CD

पिंपरी, ता. ६ ः पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला पाणीपुरवठा करणारे आंद्रा धरण बुधवारी शंभर, तर पवना धरण (ता. ६) ९५ टक्के भरले आहे. दोन्ही धरणांतील ३० जुलैपर्यंतचा साठा पाहता तो वर्षभराच्या पाणीपुरवठ्यासाठी पुरेसा आहे. याशिवाय पवना, इंद्रायणी मुळा या नद्यांच्याही पाणी पातळीत वाढ झाल्याने उद्योगनगरीची तृष्णा वर्षभरासाठी तृप्त राहील.
शहरासह परिसरातील गावांचीही पाण्याची वर्षभराची काळजी मिटली आहे. यात मावळ, मुळशीसह खेड तालुक्यांतील पवना व इंद्रायणी या नद्यांवर अवलंबून असलेल्या गावांचा आणि औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे.
उद्योगनगरीचा पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत पवना नदीवरील पवना धरण आहे. दोन वर्षांपासून आंद्रा धरणातील पाणीही मिळत आहे. त्यासाठी पवना नदीवर रावेतला, तर इंद्रायणी नदीवर निघोजे-तळवडे येथे बंधारा बांधण्यात आला आहे. त्यातून जलउपसा करून अनुक्रमे निगडी प्राधिकरण सेक्टर २३ आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते.
शहराच्या २०४१ मधील संभाव्य लोकसंख्येचा विचार करून मुळा नदीवरील मुळशी धरणातूनही पाणी देण्याची मागणी केली जात आहे. गेल्या दोन महिन्यांत तीनही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली. धरणांमधून विसर्गही करण्यात आला आहे. ओढे-नाले वाहू लागले आहेत. त्यामुळे नद्यांच्याही पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

...तरीही पाणी दिवसाआडच
पवना, आंद्रा धरणे भरली असली तरी महापालिकेतर्फे शहराला दिवसाआडच सुरू असणारा पाणीपुरवठा होणार आहे. शहराच्या सर्व भागांत समांतर व समन्याय पद्घतीने पाणी मिळावे, पाण्याची गळती व चोरी रोखावी यासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.
याशिवाय जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे आणि चिखली जलशुद्धीकरण केंद्राद्वारे पाणी वितरणासाठी नवीन वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. भामा-आसखेड धरणातून पाणी अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे पाण्याची गळती व चोरी रोखण्यासाठी तसेच भामा-आसखेड धरणाचे पाणी मिळेपर्यंत पाणीपुरवठा दिवसाआड राहील.
---
प्रमुख धरणांतील पाणीसाठा
धरण / पाणीसाठा (दशलक्ष घनमीटर) / टक्केवारी
पवना / २५८.१० / ९४.१८
वडिवळे / ८३.३१ / १००
मुळशी / ५०५.५७ / ८६.३०
विसापूर / २५.५९ / ९९.८८
चासकमान / २३३.२४ / ९६.०६
भामा-आसखेड / २०५.५७ / ८८.४५
वडिवळे / ३९.०७ / ९४.०८
कासारसाई / १५.७७ / ९०.०४
(५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ पर्यंत)

---
प्रतिदिन मिळणारे पाणी (दशलक्ष लिटरमध्ये)
धरण / पाणी
पवना / ५३०
आंद्रा / १००
एमआयडीसीकडून विकत / ३०
---
असे आहेत पाण्याचे स्रोत
- पवना धरणाचे वीजनिर्मिती केंद्र व सांडव्यावरून विसर्ग,
- रावेत बंधाऱ्यातून उपसा
- कासारसाई धरणातून सोडलेले पाणी पवना नदीला मिळते
- पवना व कासारसाई धरणांच्या खालील बाजूस झालेल्या पावसाचे पाणी ओढे, नाल्यांद्वारे थेट नदीस मिळते
- आंद्रा धरणाच्या सांडव्यातून व त्याखालील बाजूस झालेल्या पावसाचे पाणी इंद्रायणी नदीत मिसळते
- वडिवळे धरणातून झालेला विसर्ग व त्याखालील बाजूस झालेल्या पावसाचे पाणी इंद्रायणीस मिळते

---
भविष्यातील नियोजन
- पवना धरणातून जलवाहिनीद्वारे थेट पाणी आणणे
- पवना धरण आणि रावेत बंधाऱ्याची उंची व खोली वाढवून साठा वाढविणे
- भामा-आसखेड धरणातून प्रतिदिन १६७ दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर असून जॅकवेल व जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे
- मुळशी धरणातून १० टक्के पाणी पिंपरी-चिंचवड शहराला देण्याची मागणी, त्यानुसार मुळा नदीद्वारे किंवा जलवाहिनीद्वारे पाणी मिळेल
- शहरात दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT