पिंपरी-चिंचवड

संवाद इम्‍पॅक्ट

CD

संवाद इम्‍पॅक्ट

धनेश्वर पुलाजवळ जाळी
चिंचवड गावातून येताना धनेश्वर पूल संपल्यावर डाव्या बाजूला मोठ्या खड्ड्यात नागरिक सर्व प्रकारचा कचरा टाकतात. महापालिका सेवकांना त्या खड्ड्यामधून कचरा काढता येत नाही. कचरा कुजून आणि सडून दुर्गंधी पसरते. रोगराईचा धोका निर्माण होत आहे. तेथे लोखंडी जाळी बसवल्यावर सुधारणा होईल. महापालिकेने दखल घ्यावी. असे ‘सकाळ’मध्ये सुचविले होते. महापालिकेने अंमलबजावणी करत तेथे लोखंडी जाळी बसविली आहे. आता कोणत्याही प्रकारचा कचरा आतमध्ये टाकताच येणार नाही.
- रमेश पाटील, चिंचवडगाव

धोकादायक खड्डा दुरुस्त
सांगवी फाटा जवळील ढोरे पाटील भुयारी मार्गासमोर एक मोठ्ठा व खोल खड्डा गेली १० ते १२ दिवसांपासून पडलेला होता. त्याने अपघात होण्याची शक्यता होती. ‘सकाळ’च्या संवाद सदरात ‘धोकादायक खड्डा दुरुस्त करा’ या शीर्षकाची छायाचित्रासह दिलेले वृत्त छापून आले. महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने त्याची दखल घेत संबंधित खड्ड्याची दुरुस्ती केली आहे. त्याबद्दल ‘सकाळ’चे धन्यवाद.
- सनी शिंदे, पिंपळे निलख

विजेचा अपव्यय बंद
पिंपळे सौदागरच्या लिनिअर गार्डनच्या डोम आणि गार्डन मधील दिवे दुपारपर्यंत चालूच असतात. महिन्यापासून येथे मॉनिंग वॉकसाठी येणारे नागरिक हे बघत असतात. हा वीजेचा अपव्यय आहे. उद्यान विभागाने त्वरित कार्यवाही करावी. प्रशासनाने याबाबत टायमर लावून विजेची बचत करावी, असे वृत्त ‘सकाळ’मध्ये छापून आले आणि त्यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करत दिवसा जळणारे दिवे बंद केले. याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी ‘सकाळ’ चे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.
- रमाकांत डास, पिंपळे सौदागर

आकुर्डी मंडईत स्वच्छता
काही दिवसांपूर्वी सकाळ टुडे पुरवणीमध्ये, आकुर्डी येथील श्री खंडेराया भाजी मंडईच्या पार्किंग परिसरात अस्वच्छतेबद्दल लिहिले होते. मंडईत गेल्यावर पार्किंगमध्ये खडी टाकून सगळीकडे स्वच्छता केलेली नजरेस पडली. कोठेही कचरा फेकलेला आढळला नाही. याचा सुखद धक्का बसला. या चांगल्या कारवाई बद्दल संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांचे मनापासून आभार. तसेच या सुधारणेमध्ये ‘सकाळ’ चाही मोठा वाटा आहे आणि म्हणून ‘सकाळ’ चेही धन्यवाद.
- शिवराम वैद्य, निगडी

पिंपळे गुरवमधील रस्ता दुरुस्त
राजमाता जिजाऊ गार्डन (डायनॉसोर गार्डन) पिंपळे गुरव येथे प्रवेशद्वारावर अतिशय चिखल झाला होता. ‘सकाळ’ ने त्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने तातडीने तिथे पेव्हिंग ब्लॉक टाकून रस्ता दुरुस्त केला आहे.
- एस. के. काळे, पिंपळे गुरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT