पिंपरी, ता. १९ : शहर परिसर तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे. हवामानशास्त्र विभागाने पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शिवाय, धरणांमधून विसर्ग, खोऱ्यांतील पावसाचे पाणी यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे. तर, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे.
संततधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांच्या पातळीत वाढ झाली. सोबतच पवना, कासारसाई, मुळशी, आंद्रा, वडिवळे धरणांतून विसर्ग सुरू आहे. जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली आहेत. विसर्गाचे प्रमाण वाढू शकते, असे पवना धरण पूर नियंत्रण कक्षाने महापालिकेला कळविले आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
जलद प्रतिसाद पथके तैनात
ज्याभागात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होते, अशा परिसरात विशेष लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने जलद प्रतिसाद पथके तैनात केली आहेत. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली नेमलेल्या या पथकामध्ये स्थापत्य, आरोग्य, पाणीपुरवठा, पर्यावरण, अग्निशमन, सुरक्षा, शिक्षण, वैद्यकीय अशा विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत.
आयुक्तांचा आदेश आणि सूचना
- नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करावे लागल्यास भोजन, वैद्यकीयसह सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
- क्षेत्रीय कार्यालयांमार्फत जलद प्रतिसाद पथकाने दिवसरात्र नदीकाठ परिसरावर लक्ष ठेवावे
- स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थिती हाताळावी
- सखल भागात नदीच्या पाणी पातळीची माहिती देण्यासाठी ध्वनिक्षेपकाद्वारे वारंवार सूचना द्याव्यात
- वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवावा
आपत्कालीन हेल्पलाइन
मुख्य नियंत्रण कक्ष : ०२०-६७३३११११, ०२०-२८३३११११
अग्निशमन विभाग : ७०३०९०८९९१
अग्निशमन केंद्र हेल्पलाइन
पिंपरी : ९९२२५०१४७५
भोसरी : ९९२२५०१४७६
प्राधिकरण : ९९२२५०१४७७
चिखली : ८६६९६९४१०१
थेरगाव : ७०३०९०७९९९
रहाटणी : ९९२२५०१४७८
मोशी : ७२६४९४३३३३
तळवडे : ९५५२५२३१०१
PNE25V41225
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.