पिंपरी-चिंचवड

स्पर्धा परीक्षांसाठी एनआयई अंक उपयुक्त

CD

पिंपरी, ता. २६ ः सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या घरी वृत्तपत्र येतेच असे नाही. त्यामुळे त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने ‘सकाळ एनआयई’चा अंक उपयुक्त आहे. यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यासासह अवांतर सदरे असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अवांतर वाचनाचा उपयोग होतो. त्यामुळे ‘सकाळ एनआयई’ स्पर्धा परिक्षांसाठी उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांनी या अंकाचे नियमित वाचन केले पाहिजे. अधिकाधिक विद्यार्थ्‍यांना याचा उपयोग होईल,’ असे प्रतिपादन उद्योजिका दीपा संतोष भालेकर यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी या हेतूने वल्लभनगर येथील दीपा भालेकर यांनी वाढदिवस साजरा करण्यावरील खर्च टाळत ‘सकाळ एनआयई’ उपक्रमातील शंभर विद्यार्थ्यांचे प्रायोजकत्व स्वीकारले. पिंपरी वाघेरे येथील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय आणि नेहरूनगर येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सभासद शुल्क रकमेचा धनादेश त्यांनी दिला.
उद्योजक संतोष भालेकर, तेजस भालेकर, तन्मय भालेकर, मुख्याध्यापिका सुवर्णा परदेशी, पर्यवेक्षिका वैशाली मेमाणे, रोहिणी काकडे यावेळी उपस्थित होते. पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालयात अध्यक्ष हनुमंतराव भोसले, मुख्याध्यापिका संध्या वाळुंज, नवाज शेख, लक्ष्मण गुरव, ज्योती कांबळे, अनिल राठोड, सविता महांगडे, जयश्री यादव, सखाराम साबळे उपस्थित होते.
गेल्या बावीस वर्षांपासून ‘सकाळ एनआयई’ हा राज्यस्तरीय उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात साप्ताहिक स्वरूपात ‘सकाळ एनआयई’ अंकाचे वितरण शाळानिहाय केले जाते. विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याला वाव मिळावा, या हेतूने अधिकाधिक लोकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ एनआयई’ने केले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga Crime : महाराष्ट्र ग्रामीण बँकेची तिजोरी फोडली; नाईचाकूर शाखेतून चोरट्यांनी केले १९ लाख लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वेळा फोन केला, पण मोदींनी दिला नकार; जर्मनीच्या वृत्तपत्राचा दावा

Shri Barabhai Ganpati : पेशवेकालीन परंपरेचे प्रतीक! श्री बाराभाई गणपती; १३५ वर्षांची अखंड मानाची परंपरा अकोल्यात आजही सुरू

Wall Collapse : मिरजेत भिंतीचे बांधकाम कोसळून कामगाराचा मृत्यू; सहा जण जखमी

Latest Maharashtra News Updates: मुंबईत लवकरच सुरू होणार बाईक-टॅक्सी सेवा

SCROLL FOR NEXT