पिंपरी-चिंचवड

पवनमावळात कांदा रोपांचा तुटवडा

CD

सोमाटणे, ता. १८ ः अवकाळी पावसाने कांद्याची रोपे खराब झाल्याने पवनमावळात रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे. रोपांच्या किमती गगनाला भिडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अतिवृष्टीचा परिणाम सर्वच शेतकऱ्यांच्या शेतमालावर झाला असून पिकांचे मोठे नुकसान झाले. साठवलेल्या जुन्या कांद्याचेही नुकसान झाले, तर पावसातून वाचलेला कांदा बाजारभाव नसल्याने कवडीमोल किमतीला विकावा लागला. यातून शेतकऱ्याचा खर्चही भागला नाही. यातून सावरत असताना शेतकऱ्यांनी पुढील कांदा लागवडीसाठी आवश्यकतेप्रमाणे कांदा बियाणांची पेरणी केली. कांद्याच्या रोपांची चांगली उगवण झाली होती, परंतु अवकाळी पावसाने पुन्हा कांद्याची रोपे खराब झाली. परिणामी नवीन कांदा लावणीसाठी सध्या पवनमावळात रोपांचा तुटवडा भासू लागला आहे. रोपांच्या तुटवड्यामुळे त्यांच्या किमती गगनाला भिडल्या असून नव्याने कांदा लागवड कशी करायची अशी विवंचना शेतकऱ्यांपुढे आहे.

कांदा रोपांच्या तुटवड्यामुळे यावर्षी कांद्याची लावणी कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने बियाणांच्या वाफ्यात अधिक काळ पाणी साठून राहिल्याने रोपे खराब झाली आहेत.
-नितीन गायकवाड, प्रगतिशील शेतकरी, चांदखेड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईतील कोंडी कायमची फुटणार! 'या' भागात नवा उड्डाणपूल उभारणार; वाचा सविस्तर

Agriculture News : द्राक्ष उत्पादनाचे नुकसान कागद उद्योगालाही भोवले! मागणीत तब्बल ७० टक्के घट, २१ कोटींवर फिरले पाणी

Latest Marathi Breaking News : मनमाडमध्ये सराफा बाजार बंद; लहान मुलीच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

Jaysingpur Politics: निवडणुकीच्या रणधुमाळीत भूमिगत नेते पुढे; सोशल मीडियावर चमक, गल्ल्याबोळात अचानक वावर वाढला!

Panchavati Election : पंचवटी भाजपचा हक्काचा प्रभाग, पण मतदारांचा अपेक्षाभंग! महापौर, सभापती पदे मिळूनही पाणी, उद्यानांचा प्रश्न कायम

SCROLL FOR NEXT