इंद्रायणी कॉलेज परिसरातील हायमास्ट दिवा बंद
तळेगाव स्टेशन ते चाकण रस्त्यावर आनंदनगर बसथांबा आहे. शेजारीच रामभाऊ परुळेकर शाळा आहे. इंद्रायणी कॉलेज जवळील तिठ्यावरील हायमास्ट दिवा मागच्या एक महिन्यापासून बंद आहे. विद्युत विभागाने त्वरित याची दुरुस्ती करून चालू करावा.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
PNE25V69119
चेंबरची दुरुस्ती करावी
चिंचवड गावातील अहिंसा चौकात हॉटेल कामिनी शेजारील चेंबर एका बाजूने तुटलेले आहे. याचे पाइप रस्त्यावरून जाणारे नागरिक व वाहनचालक यांच्या नजरेस दिसून येत नाही. त्यामुळे अपघात होऊ शकतो. या समस्येकडे महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्काळ दुरुस्ती करावी.
- मधुकर कांबळे, चिंचवडगाव
PNE25V69118
नवीन पथदिव्यांच्या उद्घाटनाआधीच ‘बत्ती गुल’
चिंचवडगाव ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल मार्गावर बसवलेले दोन्ही बाजूचे अर्धे दिवे बंद पडले आहेत. हे शोभेचे पथदिवे बसवून दोन महिने पण पूर्ण न झाले नाहीत, तसेच त्याचे उद्घाटन पण झालेले नाही.
- सागर पाटील, चिंचवडगाव
PNE25V69117
गणपती चौकात धोकादायक खड्डा
पिंपळे निलख येथे विशालनगर मधील गणपती चौकात भगदाड खड्डा पडले आहे. सतत वाहने जाऊन त्याचा आकार वाढत चालला आहे, त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. पालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित समस्येचे निवारण करावे.
- सनी शिंदे, पिंपळे निलख.
PNE25V69116