पिंपरी, ता. १९ : पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच भागांत गुरुवारी (ता. २०) पाणीपुरवठा बंद असणार आहे. स्थापत्य आणि विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीसाठी निगडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (ता. २१) पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.