पिंपरी, ता. १९ ः कोयाळी (ता. खेड) येथे २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान भानोबा देवाची यात्रा आहे. त्यासाठी दोन लाखांवर भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात्रा काळात अवजड वाहतूक वळविण्यात येणार असून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी केले आहे. कोयाळी कमान ते गावाकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद राहणार. त्यामुळे शेल पिंपळगावकडून येणारी वाहने वडगावमार्गे चाळीस फुटी रस्त्याने इच्छितस्थळी जातील. वडगावकडून येणारी वाहने शेलपिंपळगाव रसिका हॉटेलमार्गे इच्छितस्थळी जातील. तसेच, मरकळकडून कोयाळीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी असेल. ही वाहने धानोरी फाटा बायपास चऱ्होली बायमासमार्गे इच्छितस्थळी जातील.