पिंपरी-चिंचवड

‘डिजिटल अरेस्ट’साठी ज्येष्ठ नागरिक ‘सावज’

CD

पिंपरी, ता. २३ : सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ हा प्रकार वेगाने वाढत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ‘सावज’ केले जात आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत अशा प्रकारच्या २६ घटनांची नोंद झाली आहे. यातील बहुतांश घटना ज्येष्ठ नागरिकांबाबत घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होऊन, अशा सायबर गुन्हेगारांना घाबरू नये असे आवाहन पोलिस करत आहेत.

आपण पोलिस अधिकारी, सीबीआय, कुरिअर कंपनी किंवा बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून हे गुन्हेगार व्हिडिओ कॉल करून पीडितांना घाबरवतात आणि त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालतात. या घटनांबाबत पोलिसांकडून जनजागृती सातत्याने सुरू असते. पण, तरीही हे ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारांत फसवले जात आहेत. शहरात असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. तर, अशाच एका घटनेत ज्येष्ठ नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून दोन कोटी ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील सात आरोपींना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी मागील आठवड्यात अटक केली.

‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे काय?
पोलिसांच्या गणवेशातील तोतया पोलिस अधिकारी, सीबीआय अधिकारी, नार्कोटिक्स डिपार्टमेंट, आरबीआयचे अधिकारी बोलत असल्याचे भासवत नागरिकांना व्हॉट्स ॲप, टेलिग्राम याद्वारे व्हिडिओ कॉल करून सदैव पाळत ठेवतात. धमकी देत व्हिडिओ कॉल सुरू ठेवून हे गुन्हेगार पीडितांच्या सर्व हालचाली टिपतात. अटकेची भीती दाखवतात. त्यानंतर ऑनलाइन पैसे पाठविण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते.

अशी केली जाते फसवणूक
- तुमच्या नावावर गुन्हा नोंद झाल्याचा खोटा आरोप
- ड्रग्स, मनी लॉन्ड्रिंग, पार्सल फसवणूक केसची व ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी
- फोन बंद न करण्याचा दबाव
- सतत व्हिडिओ कॉल सुरू ठेवून भीती निर्माण करणे
- त्यानंतर बँक खात्यांची माहिती मागणे
- मोठ्या रकमेचे ऑनलाइन ट्रान्स्फर करून घेतात
- केवायसी/ओटीपी देण्यास भाग पाडतात
---
ज्येष्ठ नागरिक का होतात शिकार?
- तंत्रज्ञानाची मर्यादित माहिती
- अचानक झालेल्या आरोपांना घाबरणे
- सरकारी अधिकाऱ्यांवर अतिविश्वास
- घरात एकटे असण्याची शक्यता जास्त

ही काळजी घ्या
- अशा कॉल्सना लगेच प्रतिसाद देऊ नका.
- फोनवर घाबरवणारे आरोप झाले तर तत्काळ फोन बंद करा.
- कोणतीही वैयक्तिक माहिती, ओटीपी, खाते क्रमांक देऊ नका.
- त्यांनी पाठविलेले लिंक क्लिक करू नका किंवा कोणतेही सोशल मीडिया ॲप डाऊनलोड करू नका.
- फसवणूक झाल्यास किंवा संशयास्पद कॉल आल्यास सायबर हेल्पलाइन १९३० या क्रमांकावर अथवा www.cybercrime.gov.in यावर तातडीने संपर्क साधा.

कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट असा काहीही प्रकार नाही. कोणताही सरकारी अधिकारी कधीही व्हिडिओ कॉलवर अटक, डिजिटल अरेस्ट किंवा दडपशाही करत नाही. अज्ञात कॉलवरून भीती दाखवल्यास फोन तत्काळ बंद करा. सायबर हेल्पलाइन १९३० अथवा जवळच्या पोलिस ठाण्याशी तत्काळ संपर्क साधावा. हा सर्व आभासी प्रकार आहे.
- डॉ. शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

शहरातील ‘डिजिटल अरेस्ट’च्या घटना
महिना संख्या
मार्च - २
एप्रिल - ५
मे- १
जून - १
जुलै- २
ऑगस्ट- ५
सप्टेंबर- २
ऑक्टोबर - ५
नोव्हेंबर - ३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad Announcement: द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

मराठी बिग बॉस सुरु होणार? कलर्स मराठीने शेअर केला व्हिडिओ, नेटकरी म्हणाले...'बिग बॉसचा ६ वा सिझन...'

Blind Women's T20 World Cup: भारतीय महिला पुन्हा जगज्जेत्या! कोलंबोत पहिला वर्ल्ड कप जिंकत मानाने फडकवला तिरंगा

Nashik Election : भाजपचा बालेकिल्ला, तरी समस्या कायम! पंचवटी प्रभाग ७ मध्ये बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान

Pune Politics:'पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीची शिवसेनेबरोबर युती'; दौंडमध्ये भाजपची निवडणुकीच्या रिंगणातून माघार..

SCROLL FOR NEXT