रस्त्यावरील सिमेंटचे गट्टू हटवावेत
जुनी सांगवी येथे नृसिंह हायस्कूल व भगिनी निवेदिता बॅंक या मुख्य रस्त्यावर मागील आठ दिवसांपासून सिमेंटचे गट्टू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अडचण येत आहे. महापलिका प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.
- राजेंद्र राऊत, जुनी सांगवी
PNE25V69778
फ्लेक्स मुळे विशालनगर परिसर विद्रूप
विशालनगर वळणावरील दुभाजकावर फ्लेक्स लावले आहे. यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे, तसेच लक्ष विचलीत होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशालनगर हे राजकीय पक्षांच्या फ्लेक्स आणि पोस्टर्सने भरलेले आहे. यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे.
- सौरभ सिसोदिया, विशालनगर
PNE25V69784
दररोज सकाळी वाहतूक कोंडी नित्याची
पिंपळे सौदागरमधील कुणाल आयकॉन रस्त्यावर दररोज सकाळी वाहतूक कोंडी होत आहे, या मार्गावर सकाळी शाळेच्या बसची वाहतूक जास्त असते त्यामुळे अधिकच कोंडी वाढते. रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि वाहतुकीचे नियम न पाळता वाहने चालविल्यामुळे वाहनांची गर्दी होते. लेन बदलणे आणि बेदरकारपणे वाहने चालविणे यामुळे रस्त्याची क्षमता कमी होते आणि वाहतूक मंदावते.
- जयवंत पासेकर, पिंपळे सौदागर
PNE25V69780
मोशीतील मुख्य चौकात खड्डा
मोशी येथील मुख्य चौकात पुणे-नाशिक महामार्गावर खोदकामामुळे मागील काही दिवसांपासून खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी.
- संतोष शिंगाडे, मोशी
PNE25V69779
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.