पिंपरी-चिंचवड

सकाळ संवाद

CD

शाळेच्या टाकीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे अपव्यय
केशवनगर, चिंचवडगाव येथील माणगंगा अपार्टमेंट जवळील शाळेच्या टाकीतून पाणी वाहत आहे. दररोज पाणी बराच वेळ वाहत असल्याने पाण्याचा अपव्यय होतो. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करावी.
- शरद पुरुषोत्तम जोशी, चिंचवडगाव
PNE25V70544

मोशी परिसरात वाहतूक कोंडी नित्याची
मोशी येथील पुणे नाशिक महामार्गावर कायमच वाहतूक कोंडी असते, रुग्णवाहिका जायला सुद्धा रस्ता मिळत नाही, या परिसरातील अतिक्रमण हटवून दोन वर्षे होऊन गेले तरी सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. पर्यायी रस्ता सुद्धा उपलब्ध नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तत्काळ तोडगा काढावा.
- देवेंद्र पाटील, मोशी
PNE25V70545

खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका
पाटीलनगर, चिखली येथील ब्ल्यू डाइस सोसायटी समोरील पाण्याच्या टाकी जवळ खड्डे पडल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा संपला तरी येथील खड्डे बुजविले नाहीत. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन या परिसरातील खड्डे बुजवावेत.
- पुष्पराज आंबरे, चिखली, पाटीलनगर
PNE25V70543

सांडपाणी वाहिनी दुरुस्त करावी
सेक्टर दोन इंद्रायणीनगर भोसरी मधील मिनी मार्केट मंडई शेजारील सांडपाणी वाहिनी तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिका प्रशासनाने येथील सांडपाणी वाहिनी तत्काळ दुरुस्त करावी.
- सागर सुपल, इंद्रायणीनगर, भोसरी
PNE25V70542,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Service Close : मोठी बातमी! युपीआय सेवा ठप्प; लाखो व्यवहार रखडले

Amravati Student Scholarship Issue : अमरावतीमध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर गंडांतर ; महाविद्यालयांचा हलगर्जीपणा नडणार!

Arjun Tendulkar Wedding: अर्जुनच्या लग्नासाठी PM मोदीनांही आमंत्रण; स्वत: वरबाप सचिन तेंडुलकरने केली पोस्ट

T20 World Cup: न्यूझीलंडच्या सलमीवीरांनी वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकला सामना; स्पर्धेत्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीला रवाना; मोदी, शहांची भेट घेणार!

SCROLL FOR NEXT