पिंपरी-चिंचवड

शालेय जगत

CD

शालेय जगत

सयाजीनाथ विद्यालय
वडमुखवाडीतील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात निर्माण फाउंडेशनने विद्यार्थ्यांसाठी व्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम यांचे ‘इतिहासातून आम्ही काय शिकलो?’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रारंभी प्रा. कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्राचार्य राजकुमार गायकवाड , विभाग प्रमुख नितीन वारखडे, नीलम नाईक, युवा रणरागिनी निर्माण फाउंडेशनचे प्रमुख मनोज रामगुडे आदी उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, सदस्या प्रा. अलका पाटील यावेळी उपस्थित होते. निवृत्ती ठाणवे यांनी सूत्रसंचालन केले. शिरीषकुमार सूर्यवंशी यांनी आभार मानले.

सीएमएस स्कूल
प्राधिकरणातील सीएमएस सेकंडरी हायस्कूल आणि पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय सीएमएस फूड कार्निव्हलचा आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष टी. पी. विजयन, सरचिटणीस सुधीर नायर, खजिनदार पी. अजयकुमार, उपाध्यक्ष पी. श्रीनिवासन, जॉय जोसेफ, कलावेदीचे अध्यक्ष पी. व्ही. भास्करन, समन्वयक जी. करुणाकरन, सहसचिव पी. सी. विजयकुमार, फॅन्सी विजयन, सहखजिनदार व्ही. के. रामकृष्णन, जी. एस. नायर, टी. व्ही. उम्मन, अनिल परमेश्वरन, प्राचार्या बी. जी. पिल्ले, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चैताली लोंढे आदी उपस्थित होते. यावेळी अनेक पालकांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. ‘हरित महाराष्ट्र’ या उपक्रमासाठी शाळेतर्फे सुमारे तीन हजार मुलांना वनौषधींचे रोप भेट देण्यात आले. यावेळी मनोरंजनपर कार्यक्रमही झाले. उपक्रमाचे नियोजन पालक शिक्षक समितीचे योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.


श्री गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक
श्री गुरू गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात विज्ञान व भूगोल प्रकल्प प्रदर्शन झाले. प्राचार्य हनुमंत मारकड यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व सांगितले. प्रमुख पाहुणे डॉ. संजीवकुमार पाटील संशोधक यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या यशस्वी जीवनाची पाच तत्त्वे याविषयी मार्गदर्शन केले. सीमा जंगले यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक हितेंद्र लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्पांचे परीक्षण मारुती तोत्रे, अविनाश शिरसाट, सोनाली सोनवणे, विजया थोरात यांनी केले. उपक्रमाचे नियोजन पल्लवी बापुले, वर्षा कुलकर्णी यांनी केले. संतोष सुरवसे यांनी आभार मानले.

गुरुमैय्या प्रभाकंवरजी विद्यामंदिर
श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी प्राथमिक विद्यामंदिर व शिशुविहार विद्यामंदिराच्या वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात झाला. श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त नवीनचंद लुंकड, योग प्रशिक्षक उत्तम भोसले, युद्ध कला प्रशिक्षक अशोक महाराज पवार, माजी मुख्याध्यापक रमेश बरडिया, संदीप नेवगे यावेळी उपस्थित होते. लुंकड व खेळाडू उत्तम भोसले यांनी विद्यार्थ्यांना योग व आरोग्याचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी कब बुलबुल संचलन व क्रीडा ज्योत प्रज्वलन झाले. सचिन परब यांनी निवेदन केले. रेखा पितळीया यांनी प्रास्ताविक केले. कविता वाल्हे, विद्या कोकाटे यांनी नियोजन केले. मुख्याध्यापक जयप्रकाश दहिफळे यांनी आभार मानले.

फत्तेचंद जैन विद्यालय
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावी विभागात काव्य गायन व वाद्यवादन स्पर्धा झाली. प्राचार्या सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, पर्यवेक्षक संजीव वाखारे, पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी, शिक्षक प्रतिनिधी मीनाक्षी ताम्हाणे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. काव्य गायन स्पर्धेमध्ये ७७, तर वाद्यवादन स्पर्धेत ४७ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. स्पर्धेचे नियोजन सुवर्णा गायकवाड व वंदना पाटील यांनी केले. पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया यांनी प्रास्ताविक केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT