पिंपरी-चिंचवड

जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक

CD

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून २९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येथील रामनगर येथे घडला. याप्रकरणी सत्यम सुभाष गाडे (रा. रामनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निखिल शिवाजी जाधव (रा. शेरे, ता. कराड, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी व इतर साक्षीदार यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा दहा टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीसह इतर साक्षीदारांकडून एकूण ३३ लाख ६६ हजार रुपये घेतले. सुरुवातीला चार लाख २८ हजार रुपये परत करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदार यांना उर्वरित परतावा न देता त्यांची एकूण २९ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली.

कामगाराच्या मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : कंपनीतील क्रेन कामगाराच्या अंगावर आल्याने क्रेन व भिंतीच्या मध्ये दबल्याने कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या कंपनीतील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चिखलीतील म्हेत्रे वस्ती येथील दत्तगुरु इंडस्ट्रिअल वर्क्स येथे घडली. सुरेश आहेर (रा. शांतीनगर सोसायटी, म्हेत्रे वस्ती, चिखली) असे या घटनेत मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा पियुष आहेर याने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संदीप पाटील, रमेश मुगनाळे, अजय गावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सुरेश हे कंपनीत रंगकाम करीत असताना कंपनीतील मदतनीस संदीप पाटील व मेकॅनिक रमेश मुगनाळे हे काम करीत असलेल्या क्रेनवर लक्ष न देता निष्काळजीपणा केला. दरम्यान, क्रेन अचानक सुरू झाली अन् ती सुरेश आहेर यांच्या दिशेने आली. त्यानंतर क्रेनच्या टायर व भिंतीच्या मध्ये दबल्याने सुरेश आहेर गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संदीप पाटील, रमेश मुगनाळे यांच्यासह कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले कंपनीचे व्यवस्थापक अजय गावडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : ओबीसी आरक्षण संपण्याच्या भीतीने आणखी एकाने जीवन संपविले

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT