पिंपरी, ता. १४ ः जागतिक फर्स्ट एड दिनानिमित्त इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपघात अथवा आपत्कालीन प्रसंगी त्वरित दिल्या जाणाऱ्या प्राथमिक उपचारांची माहिती देण्यात आली. तसेच सीपीआरचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी डॉ. जयवंत श्रीखंडे, डॉ. निर्मलकुमार राक्षे, सुनील बोरसे, संतोष माने व संस्थेचे सर्व प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थिती होते.
आपत्कालीन स्थितीत योग्य वेळेत दिलेली मदत जीव वाचविण्यास उपयुक्त ठरते. अपघात, भाजणे, श्वास गुदमरणे, इजा इत्यादी प्रसंगी ‘फर्स्ट एडचे’ ज्ञान आवश्यक आहे. रस्ते अपघातांमध्ये त्वरित मदत करण्यासाठी वाहनचालकांना प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जीवितहानी टाळता येते. यावेळी मोटार वाहन कायद्यातील सोनेरी तास आणि जिवनदूत या तरतुदीचे महत्त्व आयडीटीआरचे प्राचार्य संजय ससाणे यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.