पिंपरी-चिंचवड

श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयाच्या खो-खो संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

CD

पिंपरी, ता. १५ ः गेनबा सोपानराव मोझे संस्थेच्या वडमुखवाडी येथील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयातील खो-खो संघाची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर, विद्यालयातील प्राथमिक विभागातील राऊ बिराजदार व श्रेया जाधव या दोघी खेळाडू विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पूर्णा नगर, चिंचवड येथील श्री पंडित दीनदयाल क्रीडा संकुलात ११ व १२ सप्टेंबर रोजी १४ वर्षीय मुलींच्या खो-खो स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत एकूण १२४ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत श्री सयाजीनाथ महाराज माध्यमिक विद्यालय व श्री सयाजीनाथ महाराज प्राथमिक विद्यालय यांच्यामध्ये अटीतटीचा अंतिम सामना रंगला. यात माध्यमिक विद्यालयाने अंतिम सामना जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. तर, प्राथमिक विद्यालयाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. यामध्ये कर्णधार अपर्णा वर्धे, ज्ञानेश्वरी इंगळे, आराध्या गीते, प्रणिती गवते यांनी अष्टपैलू खेळ करत विद्यालयाला प्रथम क्रमांक मिळवून दिला. या विद्यार्थिनींना विद्यालयातील क्रीडाशिक्षक संजय जैनक व प्रशिक्षक अविनाश करवंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, सदस्या प्रा. अलका पाटील, प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी विजयी खेळाडू विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omkar Elephant : ओंकार हत्तीला 'वनतारा'त पाठवणार! न्यायालयाच्या आदेशानंतर पालकमंत्री नीतेश राणेंची माहिती

Nashik Kumbh Mela : सिंहस्थाच्या कामांचा श्रीगणेशा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साडेपाच हजार कोटींच्या विकासकामांचा नारळ फुटला!

Dark Energy : ब्रह्मांडातील ‘डार्क एनर्जी’चे उलगडले रहस्य; अभ्यासादरम्यान शास्त्रज्ञांचे निरीक्षण

Latest Marathi Breaking News Live : ग्वालियर येथील अपघातात पाच जणांचा मृत्यू

RSS नेत्याच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या, डोक्यात मारली गोळी; भरदिवसा घडलेल्या घटनेनं खळबळ, CCTVमध्ये हल्लेखोर कैद

SCROLL FOR NEXT