पिंपरी, ता. १४ : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार आयटी अभियंता तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी (ता. १४) दुपारी दोनच्या सुमारास मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाकड येथील भुजबळ चौकाजवळ ही दुर्घटना घडली. अमेय सुनील साळेगावकर (वय २८, रा. बालेवाडी, मूळ रा. लातूर) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. अमेय मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होते. मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अमेय मित्रांसमवेत बालेवाडीत राहायचे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
---------------