यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये हिंदी दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. भारतात १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त शाळेत काव्य गायन स्पर्धा, जाहिरात लेखन स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेतल्या. सिद्धांत इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या प्रा. नंदा कुलकर्णी तसेच नूतन विद्यालय एज्युकेशन सोसायटी गुलबर्गाच्या माजी मुख्याध्यापिका मुक्ता कुलकर्णी, प्राचार्या शारदा साबळे, हिंदी विभाग प्रमुख सविता नाईकरे उपस्थित होत्या. यावेळी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ‘बधाई कार्ड’ प्रदर्शनास उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वितेसाठी अमृता गायकवाड, जयश्री चव्हाण, कविता गायकवाड, सुनंदा खेडेकर, गंगाधर वाघमारे, शिवाजी अंबिके यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सविता नाईकरे यांनी केले तर, आभार अमृता गायकवाड यांनी मानले.
मॉडर्न इंग्रजी माध्यम
निगडी येथील मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. अ. ल. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, अतुल फाटक, माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका गौरी सावंत, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे, पांडुरंग मराडे उपस्थित होते. यावेळी डॉ. देशमुख यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रणालीची माहिती शिक्षक आणि पालकांना दिली. यावेळी शिक्षकांचा सन्मान त्यांनी केला. सूत्रसंचालन ज्ञाती चौधरी, परिचय स्वाती देशपांडे यांनी तर आभार गौरी सावंत यांनी मानले. याप्रसंगी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, संस्थेचे कार्यवाह शाळा समिती अध्यक्ष प्रा. शामकांत देशमुख आदींचे मार्गदर्शन लाभले.
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रास्ताविक हिंदी विषय प्रमुख हरीश शिंदे यांनी केले. पायल कांबळे यांनी हिंदी दिनाविषयी मनोगत व्यक्त केले. उपमुख्याध्यापिका सुषमा बंब यांनी कविता सादर केली. प्राचार्या सारंगा भारती यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार वाढला पाहिजे, असे सांगितले. यावेळी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी समूहगीत, देशभक्तिपर गीत, हिंदी कविता गायन व हिंदी नाटिका अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. ‘सार्वजनिक गणेशोत्सव, भ्रष्टाचार को रोकना है देश को बचाना है, आज का गणेशोत्सव ’’ अशा विविध विषयांवर नाटिका सादर केल्या. निकिता साठे, वैष्णवी सोनवणे, अदिती धावारे या विद्यार्थिनींनी हिंदी दिनाचे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रांजल जाधव व सायली टोपारे यांनी केले. आभार मनीषा पारधी यांनी मानले.
श्री म्हाळसाकांत विद्यालय
श्री म्हाळसाकांत उच्च माध्यमिक विद्यालयातील अकरावीच्या विद्यार्थ्यांना निगडी पोलिस ठाणे अंतर्गत दामिनी ग्रुप तर्फे वाहतुकीचे नियम, पोक्सो कायदा, रॅगिंग, बॅड टच याबाबत महिला पोलिस अंमलदार पूजा सोनवणे व वैशाली खेडकर यांनी समुपदेशन व मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. प्राचार्य भानुदास मालुसरे यांनी संस्कार आणि विद्यार्थ्यांचे जडणघडण यावर मार्गदर्शन करून संस्कार मूल्य रुजविण्यास सांगितले. सूत्रसंचालन प्रा. सुनील कर्डिले यांनी केले. नियोजन प्रा. मुकिंदा बुर्डे, शरद सस्ते, उपप्राचार्य शशिकांत सात्रज यांनी केले.
श्री फत्तेचंद जैन विद्यालय
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर महाविद्यालयामध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व सरस्वती वंदनेने करण्यात आली. प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी केले. दरम्यान, हिंदी भाषा दिनाचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर करण्यात आली. नाटिकेचे मार्गदर्शन मेघा नलावडे यांनी केले. तसेच राष्ट्रीय भाषेचे महत्त्व दर्शविणारी हिंदी गीत सादर करण्यात आले. वंदना पाटील यांनी मार्गदर्शन केले. ओम परदेशी यांनी हिंदी कविता सादर केली. पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया यांनी हिंदी दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य सुनीता नवले यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगितले. सूत्रसंचालन ज्योती छाजेड यांनी केले. आभार पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी यांनी केले.